lakdya hanuman farm esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : लाकड्या हनुमान येथे गांजाच्या शेतावर छापा

सकाळ वृत्तसेवा

शिरपूर (जि. धुळे) : लाकड्या हनुमान (ता. शिरपूर) येथील गांजाच्या शेतावर छापा टाकून पोलिसांनी (Police) सात लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

धुळे येथील स्थानिक गुन्हे शाखा व सांगवी येथील तालुका पोलिस ठाण्याच्या पथकाने सोमवारी (ता. १३) ही कारवाई केली. संशयित मात्र फरारी झाला. (police raid ganja farm in Lakdya Hanuman seized goods worth 7 lakhs dhule news)

स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक हेमंत पाटील यांना लाकड्या हनुमान शिवारात शेतात गांजाची अवैधरीत्या लागवड केल्याची माहिती मिळाली होती. त्यांनी सहकाऱ्यांसह सांगवी पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक सुरेश शिरसाट यांना सोबत घेऊन छापा टाकला. तूर, हरभरा व कपाशीच्या आड लागवड केलेली गांजाची तीन ते पाच फूट उंचीची एकूण २८५ झाडे आढळली.

ती मुळासकट उपटून काढण्यात आली. त्यांचे वजन २३६ किलो २० ग्रॅम असून, किंमत सात लाख आठ हजार ६० रुपये आहे. संशयित रवी कालूसिंह पाडवी (रा. लाकड्या हनुमान) याने गांजाची लागवड केल्याचे निष्पन्न झाले.

हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

छाप्याचा सुगावा लागल्याने तो फरारी झाला असून, त्याच्याविरोधात सांगवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, अपर अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक हेमंत पाटील, सहाय्यक निरीक्षक सुरेश शिरसाट,

उपनिरीक्षक बाळासाहेब सूर्यवंशी, संदीप पाटील, हवालदार संदीप सरग, सुरेश भालेराव, महेंद्र सपकाळ, जगदीश सूर्यवंशी, विनोद पाठक, योगेश साळवे, योगेश ठाकूर, कैलास महाजन, पोलिस नाईक संदीप ठाकरे, योगेश मोरे, संजय भोई, कृष्णा पावरा, रोहिदास पावरा, इसरार फारुकी, संतोष पाटील आदींनी ही कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Google Pay Global Credit Card : ‘गुगल पे’ने लाँच केले 'ग्लोबल क्रेडिट कार्ड' ; आता 'UPI' द्वारे होणार पेमेंट!

Marathwada ACB : मानधन काढून देण्यासाठी पैशांची मागणी; लाच स्वीकारताना दोन आशा वर्कर ताब्यात!

Insurance Bill: विमा क्षेत्रात मोठी झेप! ‘सबका बिमा सबकी रक्षा’ विधेयक मंजूर; नव्या कायद्याचे परिणाम काय?

Baramati Crime : कट रचून खून केल्याचे सिद्ध; बारामती न्यायालयाचा निकाल; आरोपींना आजन्म कारावास!

Pune News : भाजप उमेदवाराच्या मुलाला मद्य वाहतूक करताना पकडले; मद्याच्या बाटल्यांसह मोटार जप्त!

SCROLL FOR NEXT