Dr. Gavit & MLA Chandrakant Raghuvanshi esakal
उत्तर महाराष्ट्र

Market Committee Election : बाजार समिती निवडणूकीत राजकीय प्रतिष्ठा पणाला; नंदुरबारसाठी चुरस वाढली

सकाळ वृत्तसेवा

Market Committee Election : नंदुरबारसह जिल्ह्यातील सहाही कृषी उत्पन्न बाजार समित्यांची निवडणुका प्रक्रीया सध्या सुरू असून, उमेदवारी अर्जांच्या संख्येवरून इच्छुकांची भाऊगर्दी मोठ्या प्रमाणात वाढल्याचे स्पष्ट झाले आहे.

येत्या २० एप्रिलला माघारीच्या अंतिम दिवशी घडणाऱ्या घडामोडींनंतरच खरे चित्र स्पष्ट होणार असले, तरी निवडणुका अत्यंत चुरशीच्या आणि अटीतटीच्या होतील, अशी चिन्हे दिसू लागली आहेत.

दरम्यान, या निवडणुका जिल्ह्यात राजकीय नेत्यांसाठी प्रतिष्ठेच्या ठरत असल्याने राजकीय नेत्यांनी प्रतिष्ठा पणाला लावून निवडणुक जिंकण्याचा चंग बांधला आहे. विशेषतः नंदुरबार बाजार समिती सर्वात प्रतिष्ठेची ठरणार आहे. (Political reputation at stake in market committee election competition increased for Nandurbar news)

बाजार समित्यांवरील आतापर्यंतच्या राजकीय वर्चस्वाचा विचार केल्यास नंदुरबार बाजार समितीवर मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी पाच वर्ष सत्ता प्रस्थापित करून माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचा वर्चस्वाला धक्का दिला होता.

मात्र, त्यानंतर श्री. रघुवंशी यांनी पुन्हा बाजार समिती आपल्या ताब्यात घेतली. सध्याही त्यांचेच वर्चस्व आहे. आताच्या निवडणुकीतही भाजपचे नेते तथा मंत्री डॉ. गावित व शिवसेनेते नेते चंद्रकांत रघुवंशी यांच्या गटात चुरशीची लढत रंगणार आहे.

दोन्हीही नेत्यांचे राज्यपातळीवर वर्चस्व असल्यामुळे त्यांच्यासाठी ही निवडणुक राजकीय प्रतिष्ठेची ठरणार आहे. नंदुरबार बाजार समितीत भाजपचे युवा नेते डॉ. विक्रांत मोरे स्वतः निवडणुक रिंगणात आहेत. त्यामुळे अधिकच प्रतिष्ठेची ठरणार आहे.

नवापूरला माजी मित्रांत लढत

नवापूर बाजार समितीवर कॉंग्रेसचे एकतर्फी वर्चस्व होते. आता माणिकराव गावित यांचे पुत्र भाजपमध्ये आहेत. त्यामुळे कॉंग्रेसचे आमदार शिरीषकुमार नाईक व भाजपचे नेते भरत गावित यांच्या गटात चुरशीची लढत होणार आहे.

या बाजार समितीवरील आतापर्यंत असलेले कॉंग्रेसचे वर्चस्व शाबूत राहते, की भाजपचे भरत गावित यांचे वर्चस्व सिद्ध होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. कारण हे दोन्ही नेते यापूर्वी एकत्र होते. त्यामुळे दोघांचे वर्चस्व होते.

आता मात्र परिस्थिती बदलली आहे. डोकारे साखर कारखाना निवडणुकीत आमदार नाईक गटाला धक्का देत भरत गावित यांनी वर्चस्व सिद्ध केले आहे. कारखाना ताब्यात घेतला आहे. तसेच चित्र बाजार समितीतही निर्माण होऊ शकते. त्यामुळे दोन माजी मित्रांच्या गटांमध्येच जोरदार लढत होणार आहे.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

शहाद्यातील क्लिष्ट चित्र

दरम्यान, शहादा बाजार समितीवर दीपक पाटील गटाचे आतापर्यंत एकतर्फी वर्चस्व होते. मात्र, सध्या अभिजित पाटील यांनीही उमेदवार दिले आहेत. महाविकास आघाडीही निवडणुक रिंगणात आहे.

मंत्री डॉ. गावित यांच्या नेतृत्वाखाली हेमलता शितोळे यांनीही वेगळा गट उभा केला आहे. विशेष म्हणजे दीपक पाटील हे भाजपमध्ये असताना त्यांच्याच पक्षाचा दुसरा गट निवडणुक रिंगणात आहे. त्यामुळे शहाद्यात क्लिष्ट चित्र निर्माण झाले आहे.

बिनविरोधची परंपरा

तळोद्यात बिनविरोधची पंरपरा आहे. जागा वाटपाचा सर्वपक्षीय फार्म्युला ठरला असल्याचे बोलले जात आहे. मात्र माघारीच्या शेवटच्या दिवशीच चित्र स्पष्ट होणार आहे. अक्कलकुवामध्ये पाच जागा बिनविरोध झाल्यात जमा आहेत.

इतर १३ जागांसाठी निवडणुक होईल. शिवसेना व कॉंग्रेसमध्ये लढत होईल. धडगावमध्ये कॉंग्रेस व शिवसेना (शिंदे गट) यांच्या लढत होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China criticizes US: भारताची बाजू घेत चीनने पुन्हा एकदा अमेरिकेवर केली उघडपणे टीका, म्हटले...

Rohit Sharma कर्णधार म्हणून कसा आहे? राहुल द्रविडने स्पष्टच सांगितले; म्हणाला, 'मला नेहमीच जाणवलं तो...'

Donald Trump: अलास्कातून परतताना पुतिन यांनी इंधनासाठी २.२ कोटी रुपये रोखीने दिले; नेमकं काय घडलं?

Solapur News : मालमत्ता करदात्यांना सुवर्णसंधी! ३० सप्टेंबरपर्यंत व्याज-दंडात १००% सूट

Maharashtra Latest News Update: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT