उत्तर महाराष्ट्र

छगन भुजबळांना दिलेल्या धमकीचा सटाण्यात तीव्र निषेध

सकाळवृत्तसेवा

सटाणा : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना काल 'संभाजी भिडे यांचं नाव काढल्यास तुमचा देखील दाभोळकर - पानसरे करू' तसेच मनुस्मृतीला विरोध केल्यास जीवे ठार मारण्याची धमकी निनावी पत्राद्वारे देण्यात आली आहे. या घटनेचा बागलाण तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस, बागलाण तालुका महात्मा फुले समता परिषद व ओबीसी समाज बांधवांतर्फे आज (ता. 29) तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. राज्य शासनाने धमकी देणाऱ्यांना तात्काळ अटक करीत कठोर कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा संतप्त इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला.

काल (ता. 28) नाशिक येथील भुजबळ फार्मवर हे धमकीचे निनावी पत्र आले. हे वृत्त वाऱ्यासारखे पसरताच सटाणा शहर व तालुक्यात तीव्र निषेध करण्यात आला. आज आमदार दीपिका चव्हाण, समता परिषदेचे विभागीय प्रमुख धर्मराज खैरनार, माजी आमदार संजय चव्हाण, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष शैलेश सूर्यवंशी, व माजी नगराध्यक्ष भारत खैरनार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेस, महात्मा फुले समता परिषद व ओबीसी समाज बांधवांनी नायब तहसीलदार विनोदकुमार चव्हाण व पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांची भेट घेऊन निषेध व्यक्त केला आणि मागण्यांचे निवेदन दिले. निवेदनात, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना निनावी पत्राद्वारे विकृत प्रवृत्तीच्या लोकांनी दिलेल्या धमकीचा आम्ही सर्व निषेध करीत आहोत. भुजबळ हे राज्याचेच नव्हे तर देशातील ओबीसी चळवळीचे प्रमुख नेते आहेत. त्यांनी समता परिषदेतर्फे देशभरात समतेचा जागर केला असून शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारधारेचा व पुरोगामी विचारांचा पुरस्कार केला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे ते जेष्ठ व प्रमुख नेते आहेत. अशा नेतृत्वास काही हीन व दृष्ट प्रवृत्तीच्या लोकांनी निनावी पत्राद्वारे धमकावण्याचा प्रयत्न करणे ही राज्यासाठी अत्यंत निंदनीय बाब आहे. संबधितांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करावी, अन्यथा कोणतीही पूर्वसूचना न देता तीव्र आंदोलन छेडण्याचा संतप्त इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.

यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, दादाजी खैरनार, मनोज वाघ, डॉ. मनिष ढोले, ज. ल. पाटील, एड. सोमदत्त मुंजवाडकर, सुनील खैरनार, यशवंत कात्रे, गौरव वाघ, संदीप खैरनार, सुरज खैरनार, सुदर्शन खैरनार, शमा दंडगव्हाळ, उषाताई भामरे, संजय देसले, राजेंद्र जाधव, ज्योतीराव बच्छाव, नाना ढेपले, एन. एम. गांगुर्डे, बबलू खैरनार, आदींसह भुजबळ समर्थक उपस्थित होते.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : प्रज्वल रेवण्णा स्कॅंडल प्रकरणात जनता दल सेक्युलर पक्षाची मोठी कारवाई

Sangli Lok Sabha : 'जयंत पाटील काड्या करण्यात आणि संजय पाटील थापेबाजीत पटाईत'; माजी आमदाराची जोरदार टीका

Solapuri Chaddar : मोदींना गिफ्ट दिलेल्या सोलापुरी चादरीचा इतिहास माहित आहे का ?

Babil Khan: इरफान खानच्या लेकाचं होतंय कौतुक; पाण्याच्या समस्येसाठी काम करणाऱ्या संस्थेला केली मोठी आर्थिक मदत

Lok Sabha Election: PM मोदींच्या सभेमुळे ६ ठिकाणी वाहनतळ, ५ ठिकाणचे रस्ते बंद, २० मिनीटे अंत्ययात्रा रोखली

SCROLL FOR NEXT