fire crackers market  esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयातर्फे फटाके विक्रीसाठी तात्पुरते परवाने

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : दीपावली सणानिमित्त किरकोळ फटाके विक्रीचे तात्पुरते परवाने मंजूर करण्यास १६ ऑक्टोबर २०२३ पासून उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयामार्फत सुरवात करण्यात येत आहे, असे उपविभागीय दंडाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी राहुल जाधव यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.(Provisional license for sale of firecrackers by Sub Divisional Magistrate dhule news)

उपविभागीय दंडाधिकारी जाधव यांनी म्हटले आहे, की मागील वर्षाप्रमाणे या वर्षीही महापालिका व पोलिस अधिकारी यांच्या कार्यालयाकडून मंजुरी दिलेल्या ठिकाणी तात्पुरते फटाका दुकान लावण्यासाठी जागा निश्चित करण्यात येणार आहे.

धुळे शहरात फटाका विक्रेत्यांनी महापालिका क्षेत्रात महापालिका आयुक्त व पोलिस अधीक्षक यांच्याकडून जागा निश्चित करून फटाका विक्री करण्यासाठी ना हरकत पत्र प्राप्त करून घेत उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयाकडे सादर करावे.

या वर्षी धुळे शहर व उपविभागाकरिता १६ ते २७ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत अर्ज स्वीकारण्यात येतील. त्यानंतर आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही.

संबंधित इच्छुक अर्जदारांनी आपल्या अर्जासमवेत महापालिका, नगर परिषद, संबंधित गावाची ग्रामपंचायतीचे ना हरकत पत्र, आधारकार्डची छायांकित प्रत, शाळा सोडल्याच्या दाखल्याची प्रत तसेच पासपोर्ट आकाराच्या दोन छायाचित्रांसह विहित कालावधीत उपविभागीय दंडाधिकारी यांच्या कार्यालयाकडे सादर करावेत.

महापालिका, नगर परिषद, संबंधित गावाच्या ग्रामपंचायतीने ठरवून दिलेल्या जागेव्यतिरिक्त धुळे शहरात (महापालिका क्षेत्रात) व जिल्ह्यातील गावात कुठेही फटाका विक्रीचे दुकान आढळून आल्यास संबंधितांविरुद्ध पोलिस विभागामार्फत कारवाई करण्यात येईल, असेही उपविभागीय दंडाधिकारी जाधव यांनी नमूद केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

SCROLL FOR NEXT