nashik.
nashik. 
उत्तर महाराष्ट्र

संतोष मुसळेंच्या सावित्रीच्या लेकी पुस्तकाचे प्रकाशन

सकाळवृत्तसेवा

खामखेडा (नाशिक) - प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणासाठी व गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी शासन स्तरावरुन अनेकविध नाविन्यपूर्ण योजना राबविल्या जात आहेत. आजघडीला गावोगावीच्या जिल्हा परिषद शाळांमध्ये अधिकारी व शिक्षकांनी खांद्याला खांदा लावून 'अधिकारी-शिक्षक-समाज-शाळा-विद्यार्थी'यांनी शैक्षणिक सेतू तयार केलाय. यात महिला शिक्षिकांचे योगदानही  खुप मोलाचे आहे. अशाच राज्याच्या कानाकोपऱ्यात  शिक्षणाची छोटी छोटी बेटं निर्माण करणाऱ्या महिला उपक्रमशील अधिकारी व शिक्षिकांच्या प्रयत्नांच्या यशोगाथांची माहिती करुन देणारे संतोष मुसळे लिखीत व अनुश्री प्रकाशन पुणे प्रकाशित 'सावित्रीच्या लेकी'या पुस्तकाचे प्रकाशन अॅक्टिव टिचर्स सामाजिक प्रतिष्ठाण संचलित 'कृतिशील शिक्षक महाराष्ट्र' म्हणजेच अॅक्टिव टिचर्स महाराष्ट्र (ए.टी.एम) समूहाच्यावतीने दि.१० फेब्रुवारी रविवार रोजी पहिल्या राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलनात झाले.

पुस्तकाच्या प्रकाशनाप्रंसगी संमेलनाचे अध्यक्ष बाल  साहित्यीक प्रा.डॉ.विशाल तायडे, सागताध्यक्ष ज्योती बेलवले, एन सी ई आर टी दिल्ली कला व शिक्षण विभाग प्रमुख डॉ. पवन सुधीर, ज्येष्ठ साहित्यिक बाबा भांड, शिक्षणाधिकारी प्राथमिक औरंगाबाद सुरजकुमार जैस्वाल, कृतिशिल शिक्षक महाराष्ट्रचे राज्य संयोजक विक्रम अडसूळ, संजय खाडे, ज्ञानदेव नवसरे, भरत काळे, संजय खाडे यांची उपस्थिती होती.

या पुस्तकात ११ उपक्रमशिल अधिकारी व ४५ उपक्रमशिल शिक्षिकांच्या उपक्रमांचा समावेश आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi in Dharashiv: अमेरिकेत व्हाईट हाऊसमध्ये जेवणाच्या टेबलवर होतं 'सूपरफूड'; मोदींनी सांगितला किस्सा

T20 WC 24 South Africa Squad : दक्षिण आफ्रिकेने टी-20 वर्ल्ड कपसाठी संघाची केली घोषणा! 2 अनकॅप्ड खेळाडूंची ताफ्यात एन्ट्री

Indian Navy: "कोणत्याही आव्हानासाठी नौदल कायम सज्ज," पदभार स्वीकारताच नवे नौदल प्रमुख गरजले

Latest Marathi News Live Update : काँग्रेस जनतेची संपत्ती, त्यांच्या व्होटबँकेला वाटणार, मोदींचा आरोप

Swapnil Joshi: स्वप्नील जोशीच्या मुलांचा 'नाच गं घुमावर' भन्नाट डान्स; पहा व्हिडीओ

SCROLL FOR NEXT