Members of a collaboration social group putting radium stickers on vehicles. Neighbor Police Inspector Rahul Kumar Pawar, R. O. Magre, Ashok Suryavanshi, Ramesh Kumar Bhat etc. esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar News : अपघात टाळण्यासाठी वाहनांना रेडियम स्टिकर; तळोदा पोलिस ठाण्याचा उपक्रम

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar News : रात्रीच्या वेळी अंधारात बऱ्याचदा उसाची वाहतूक करणारी वाहने इतर वाहनचालकांच्या नजरेत न आल्याने, अनेकदा परिसरात लहान-मोठे अपघात झाले आहेत.

ही बाब लक्षात घेऊन सहयोग सोशल ग्रुप व तळोदा पोलिस ठाण्याने शहराजवळील श्रीकृष्ण व दसवड खांडसरी येथे जाऊन या ठिकाणी असलेल्या वाहनांना विविध रंगांचे रेडियम स्टिकर लावले. (Radium stickers on vehicles to prevent accidents nandurbar news)

तसेच रस्त्यावर येणाऱ्या-जाणाऱ्या असंख्य वाहनांनादेखील हे स्टिकर लावले. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. आता सर्वत्र ऊस तोडणीला सुरवात झाली असून, शेतकरी बांधव तसेच ट्रॅक्टरद्वारे अथवा इतर वाहनांद्वारे ऊस शेतातून कारखान्यापावेतो पोचविला जात आहे. उसाची वाहतूक करणाऱ्या वाहनांना कारखान्यापावेतो पोचत असताना बऱ्याच वेळेस रात्र होते.

बऱ्याचदा रात्रीच्या अंधारात उसाने भरलेले ट्रॅक्टर इतर वाहनांना दिसत नाही, त्यामुळे इतर वाहने अचानक ट्रॅक्टरवर धडकतात व मोठा अपघात होतो. त्या अपघातात बऱ्याच वाहनधारकांना कधी-कधी आपला जीवदेखील गमवावा लागला आहे.

ही बाब लक्षात घेऊन नेहमी समाजहितासाठी विविध उपक्रम राबवत असलेला येथील सहयोग सोशल ग्रुप व तळोदा पोलिस ठाणे यांनी पुढाकार घेऊन अंधारात लांबून चमकेल अशा लाल, पिवळ्या, हिरव्या रंगाचे रेडियम स्टिकर उसाची वाहतूक करणाऱ्या वाहनांना लावले आहेत. त्यासाठी तळोदा परिसरात असलेल्या दसवड खांडसरी व श्रीकृष्ण साखर कारखाना येथे जाऊन वाहनांना हे विविध रेडियमचे स्टिकर लावण्यात आले.

रस्त्यावर येणाऱ्या-जाणाऱ्या ट्रॅक्टरला व इतर वाहनांनादेखील रेडियमचे स्टिकर लावण्यात आले. या वेळी बऱ्याच वाहनचालकांनी स्वतःहून स्टिकर मागून घेतले व आपल्या वाहनाला लावून घेतले. यामुळे होणारा अपघात टळून जीवितहानी होणार नाही, अशी अपेक्षा सहयोग सोशल ग्रुप व तळोदा पोलिस ठाण्यातर्फे व्यक्त करण्यात आली आहे. या उपक्रमाविषयी वाहनचालकांनी समाधान व्यक्त केले, तसेच नागरिकांकडून उपक्रमाचे कौतुक करण्यात येत आहे.

पोलिस निरीक्षक राहुलकुमार पवार, महाराष्ट्र ग्राहक पंचायतीचे जिल्हाध्यक्ष आर. ओ. मगरे, सचिव अशोक सूर्यवंशी, सहयोग सोशल ग्रुपचे अध्यक्ष ॲड. अल्पेश जैन, राजाराम राणे, अतुल सूर्यवंशी, रमेशकुमार भाट, चेतन शर्मा, कुशल जैन, विनोद माळी, मोईन पिंजारी, प्रमोद जहागीर तसेच तळोदा वाहतूक शाखेचे पोलिस नाईक शशिकांत अहिरे, विजय जावरे, संदीप महाले, रवींद्र पाडवी आदी उपस्थित होते.

''अंधारात लांबून चकाकेल अशा विविध रंगांच्या रेडियमचे स्टिकर ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना लावलेले असले तर इतर वाहनांना उसाचे वाहन सहज नजरेत भरते. त्यामुळेच उसाची वाहतूक करणाऱ्या परिसरातील असंख्य वाहनांना सहयोग ग्रुपच्या माध्यमातून पिवळे, लाल, हिरव्या रंगाचे रेडियमचे स्टिकर लावले. त्यामुळे निश्चितच अपघातांना आळा बसेल.''-अॅड. अल्पेश जैन,अध्यक्ष, सहयोग सोशल ग्रुप

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Men Hockey Asia Cup: भारत पुन्हा आशियाचा बादशाह! आशिया कप फायनलमध्ये कोरियाचा पराभव, चषकावर चौथ्यांदा ताबा मिळवला

Lalbaugcha Raja Visarjan: सर्व अडथळे पार करून ३३ तासांच्या मार्गक्रमणानंतर लालबागच्या राजाचे विसर्जन संपन्न

Mohol News : सोलापूर-पुणे महामार्गावर अज्ञात पुरुषाचा कुजलेला मृतदेह सापडला, मोहोळ पोलिसांचा तपास सुरू

Ganpati Visarjan 2025 : देगलूरनगरीत ढोल, ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप; पुढच्या वर्षी लवकर या... या घोषणेने शहर दुमदुमले...!

उत्सवप्रिय सोलापुरात पहिल्यांदाच डीजेमुक्त मिरवणुका! पोलिस आयुक्तांचे मायक्रो प्लॉनिंग, सोलापूर कृती समितीसह सर्व सोलापूरकरांचा पुढाकार

SCROLL FOR NEXT