Action team with suspects in custody in illegal gas pump case. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime News : धुळ्यात अवैध गॅसपंपावर छापा; ‘एलसीबी’कडून दोघे ताब्यात

सकाळ वृत्तसेवा

Dhule Crime News : शहरातील नटराज टॉकीजजवळील रमजानबाबानगरात ‘एलसीबी’च्या पथकाने मंगळवारी (ता. १२) रात्री अवैध मिनी गॅसपंपावर छापा टाकला.

दोन जणांना ताब्यात घेत घटनास्थळाहून रिक्षासह दीड लाखाचा मुद्देमाल जप्त केला. (raid on illegal gas pump in Dhule crime news)

शहरातील रमजानबाबानगरात एका अतिक्रमित घरात साबीर शाह भोलू शाह हा घरगुती वापराच्या सिलिंडरमधील गॅस वाहनांमध्ये इंधन म्हणून अवैधरीत्या भरून देत असल्याची माहिती एलसीबीचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांना मिळाली. त्यानुसार पथकाने रात्री साडेअकराच्या सुमारास तेथे छापा टाकला.

तेव्हा एका विनाक्रमांकाच्या रिक्षामध्ये घरघुती सिलिंडरमधून गॅस भरताना दोन जण आढळले. गॅस भरणारा साबीर शाह भोलू शाह (रा. रमजानबाबानगर, ८० फुटी रोड, धुळे) व रिक्षामालक मोहम्मद कामरान गुलाम हमीद (रा. सर्व्हे क्रमांक १०, बादशाह खाननगर, मछली बाजार, मालेगाव, नाशिक) अशी दोघांनी नावे सांगितली.

संशयित दोघांकडे सिलिंडरचा कोणताही परवाना मिळून आला नाही. त्यांच्याकडून चार हजारांचे दोन गॅस सिलिंडर, पंधरा हजारांचा वीजपंप, स्प्रेअपर पंप, पाच हजारांचा इलेट्रॉनिक वजनकाटा, इलेक्ट्रिक बोर्ड व एक लाख वीस हजारांची विनाक्रमांकाची रिक्षा असा एकूण एक लाख ४५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

या प्रकरणी सुशील शिंदे यांच्या फिर्यादीनुसार संशयित दोघांवर आझादनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. श्री. शिंदे, योगेश राऊत, कमलेश सूर्यवंशी, देवेंद्र ठाकूर, जगदीश सूर्यवंशी यांनी ही कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold-Silver Rate Today: सोनं-चांदी स्वस्त! खरेदीदारांना दिलासा; तुमच्या शहरात ताजे दर पाहा

Koyna Dam Water level Today : महाराष्ट्राची 'भाग्यलक्ष्मी' अजूनही निम्म्यावरच! कोयना धरणात 51.21 टक्के पाणीसाठा, आजची स्थिती काय? वाचा ताजी अपडेट

Latest Marathi News Live Update : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशातील पहिल्या हायड्रोजन ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार

Pune Traffic: शिवाजीनगर ते औंध वाहतूक कोंडी; मेट्रो काम, अतिक्रमण आणि खड्ड्यांमुळे पुणेकर हैराण

काहीतरी मॅड येतय...! लवकरच येतोय निलेश साबळेचा नवीन शो, पोस्ट करत म्हणाला...

SCROLL FOR NEXT