नाशिक - रमजान ईदनिमित्त बाजारात खरेदी करण्यासाठी झालेली गर्दी.
नाशिक - रमजान ईदनिमित्त बाजारात खरेदी करण्यासाठी झालेली गर्दी. 
उत्तर महाराष्ट्र

चाँद नजर आ गया...

सकाळ वृत्तसेवा

जुने नाशिक - चंद्रदर्शन झाल्याने बुधवारी (ता. ५) सर्वत्र रमजान ईद साजरी केली जाणार आहे. सकाळी दहाला ईदगाह मैदानावर सार्वजनिक नमाज होईल. मंगळवारी (ता. ३) रमजान महिन्याची ऊर्दू २९ तारीख येत असल्याने चंद्रदर्शनाची दाट शक्‍यता होती. 

‘चाँद नजर आ गया, अल्ला ही अल्ला छा गया, रोजे रखनेवालो की है ये ईद’ या गीताशी साजेसे वातावरणात बुधवारी ईद साजरी करण्यात येणार आहे. शाही मशिदीमध्ये रात्री पावणेआठपर्यंत विभागीय चाँद कमिटीची बैठक सुरू होती. साडेसहानंतर चंद्रदर्शन झाले, असे संदेश झळकत होते. फोनही सुरू होते. परंतु प्रत्यक्ष चंद्रदर्शन केलेल्या व्यक्तीकडून शहादत (गवाही) मिळत नाही तोपर्यंत विभागीय चाँद कमिटी ईदची घोषणा करत नाही. शेवटी पावणेआठच्या सुमारास नानावली मशिदीचे नायब इमाम हाफिज मोहमंद मुजाहिद, सुन्नी दावते इस्लामीचे मोहमंद नासीर, बडी मशिद खतीबे इमाम काजी अजहर यांनी शाही मशिदीमध्ये चाँद कमिटीच्या बैठकीस उपस्थित दर्शवत चंद्रदर्शन केल्याची गवाही दिली. त्यानंतर शहर-ए-खतीब हिसामोद्दीन खतीब यांनी बुधवारी रमजान ईद साजरी केली जाणार असल्याची घोषणा केली. बुधवार (ता. ४) सकाळी दहाच्या सुमारास शहर-ए-खतीब हिसामोद्दीन खतीब यांच्या नेतृत्वात ईदची नमाज होईल. नमाजसाठी मोठी गर्दी होते. मुस्लिमबहुल परिसरात रिक्षातून ध्वनिक्षेपकाद्वारे ईद असल्याच्या घोषणा करण्यात येत होती.

बाजारपेठा फुलल्या
रमजान ईद बुधवारी (ता. ५) होणार असल्याच्या घोषणेने सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. पूर्वसंध्येला इफ्तारीनंतर कपड्यासह विविध वस्तूंच्या खरेदीसाठी मुस्लिम समाजबांधवांनी बाजारपेठेत गर्दी केली. मेन रोड, शालिमारसह दूधबाजार, भद्रकाली परिसरात मुस्लिम बांधव खरेदीसाठी बाहेर पडले. मुस्लिम बांधवांनी ईदच्या खरेदीपूर्वी इफ्तारसाठी लागणाऱ्या विविध खाद्यपदार्थ खरेदीसाठी दूध बाजार, बागवानपुरा, चौकमंडई, कथडा भागातील बाजारपेठांत गर्दी केली होती. जुने नाशिकमधील इफ्तारीसाठी दूध बाजार येथे सर्वांत मोठा बाजार असल्याने अनेक प्रकारच्या खाद्यपदार्थांची दुकाने सजली आहेत. पोलिसांनी येणारे मार्ग वाहतुकीसाठी बंद केल्याने काही प्रमाणात वाहतूक कोंडीही झाली. त्याचप्रमाणे ईदगाह मैदानाची स्वच्छता करून संपूर्ण मैदानावर पांढरे पट्टे मारण्यात आले. ईदगाह मशिदीची रंगरंगोटी करण्यात आली.

येथे झाले चंद्रदर्शन - नानावली, बागवानपुरा, भारतनगर, वडाळागाव, खोडेनगर, वाडीवऱ्हे 

ईदनिमित्त पोलिसांचा बंदोबस्त 
रमजान ईदनिमित्त शहर पोलिसांतर्फे शहरात चोख बंदोबस्त ठेवण्यासाठी पाचशेहून अधिक पोलिस अधिकारी व कर्मचारी यांचा फौजफाटा तैनात करण्यात येणार आहे. चार पोलिस उपायुक्त, सहा सहाय्यक पोलिस आयुक्त, पोलिस निरीक्षक, सहाय्यक पोलिस निरीक्षक, कर्मचारी, गृहरक्षक दलाचे जवान यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानुसार शीघ्र कृतिदल, दंगा नियंत्रक पथक, राज्य राखीव दलाच्या तुकड्याही तैनात करण्यात आल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT