44crime_logo_525_1.jpg
44crime_logo_525_1.jpg 
उत्तर महाराष्ट्र

बलात्काराचा आरोपी पोलीस उपनिरीक्षकाची पुण्यात आत्महत्त्या 

सकाळवृत्तसेवा

नाशिक : उपनगर परिसरातील शिक्षिकेला सोशल मीडियावरून बदनामीची धमकी देत बळजबरीने शारीरिक संबंध ठेवणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाविरोधात सोमवारी (ता.26) मध्यरात्री उपनगर पोलिसात बलात्कारासह अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर संशयित पोलीस उपनिरीक्षकाने आज (ता.27) सकाळी पुण्यातील संगम पुलाजवळ रेल्वेखाली उडी घेत आत्महत्त्या केली आहे. मात्र, सदरचा प्रकार अपघात की आत्महत्त्या याबाबत पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आलेले नाही. साजन सानप (रा. मंजुळा मंगल कार्यालयामागे, जेलरोड, नाशिकरोड) असे उपनिरीक्षकाचे नाव असून गणेश आगवणे (रा. दसक, जेलरोड) या दोघांविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. 

तक्रारदार पीडित विवाहितेने दिलेल्या फिर्यादीनुसार, पीडितेचे पती हे 2012 मध्ये नवी मुंबईच्या कुऱ्हाड पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक असताना, त्यांच्याकडे पोलीस शिपाई असलेला साजन सानप हा रायटर म्हणून नियुक्तीला होता. त्यानंतर संशयित सानप हा स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झाला आणि पोलीस उपनिरीक्षक झाला. मात्र दोघांच्या कुटूंबियांमध्ये घरगुती संबंध होते. 2014 च्यादरम्यान, पीडितेच्या घरात सिलेंडरचा स्फोट झाला असता, त्यावेळी संशयित सानप याने मदत झाली होती. त्यातून पीडितेशी संशयिताने जवळीक साधली होती. त्यावेळी संशयिताने पीडितेचे फोटो काढले होते. संशयित साजन सानप याने पीडितेला ते फोटो फेसबुकवर टाकून बदनामी करण्याची धमकी देत बळजबरीने दारू पाजली आणि जेलरोडच्या त्यांच्या राहत्या घरी बलात्कार केला. त्यानंतर तो सातत्याने त्यांच्याशी बळजबरीने शारीरिक संबंध ठेवले. तर संशयित सानप याचा साथीदार गणेश आगवणे हा पीडित शिक्षिकेवर नजर ठेवून त्यांचा पाठलाग करीत असायचा व त्यांची सारी माहिती संशयित सानप यास द्यायचा. 
याप्रकरणी उपनगर पोलिसात सध्या आंबोली पोलीस ठाण्यात उपनिरीक्षक असलेला पोलीस उपनिरीक्षक साजन सानप याच्यासह साथीदार गणेश आगवणे यांच्याविरोधात बलात्कार, विनयभंग व अॅट्रोसिटीअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

संशयित सानप याची आत्महत्त्या 
उपनगर पोलीसात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला त्यावेळी संशयित सानप हा उपस्थित होता. त्यानंतर तो दुचाकी घेऊन घराबाहेर पडला. आज सकाळपर्यंत तो घरी परतला नव्हता. दरम्यान संशयित सानप याने पुण्यात संगम पुलाखाली रेल्वे रुळावर उडी घेत आत्महत्त्या केल्याची घटना घडली. याप्रकरणी पुण्याकडे उपनगर पोलिसांचे एक पथक रवाना करण्यात आले आहे. परंतु सदरची घटना आत्महत्त्या की अपघात याबाबत पोलिसांकडून काहीही स्पष्ट करण्यात आलेले नाही. 

पीडित विवाहितेच्या तक्रारीनुसार सध्या आंबोली पोलीस ठाण्यात उपनिरीक्षक असलेला साजन सानप याच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यासंदर्भात सखोल तपास केला जाईल. सानप यांचा मृत्यु अपघाती की आत्महत्त्या हे पुणे पोलिसांच्या तपासानंतर स्पष्ट होईल. 
- श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस उपायुक्त, नाशिक.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT