samir khan aasif khan
samir khan aasif khan 
उत्तर महाराष्ट्र

भावाला वाचविण्यासाठी नदीत मारली उडी अन्‌..

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : घोडा चारण्यासाठी गेलेल्या दोन सख्या भावांचा भोकर नदीत बुडुन मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी पुनखेडा (ता. रावेर) येथे घडली. याबाबत रावेर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. 

शहरातील रझा कॉलनीतील आसिफ खान मजिद खान (वय 16) व त्याचा लहान भाऊ समिर खान मजिद खान (वय 14) हे दोघे दुपारी साडेबाराच्या सुमारास जवळच असलेल्या पुनखेडा येथील भोकर नदी लगत घोडा चारण्यासाठी गेले होते. परत येत असतांना समिर खान याचा पाय घसरुन तो नदीत पडला. लहान भाऊ वाहून जात असल्याचे पाहुन त्याला वाचविण्यासाठी आसिफ खान याने नदीत उडी मारली. मात्र दोघांनाही पोहता येत नसल्याने पाण्याची पातळी अधिक असल्याने दोघांचाही नदीत बुडुन मृत्यु झाला. याबाबत हमीदखान रशिद खान यांनी दिलेल्या माहितीवरुन रावेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पो.हे.कॉ. अर्जुन सोनवणे व सहकारी करीत आहेत. 
दुर्दैवी घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त होत आहे. घटनेचे वृत्त समजताच येथील

नगरपालिकेचे गटनेते आसिफ मोहंमद, उपनगराध्यक्ष शेख सादिक, शेख गयास, युसुफ खान, अ. रफीक, मेहमूद मन्यार, जमिल शेख यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच आमदार शिरीष चौधरी यांनी खान परिवाराशी फोनवरून संपर्क करून सांत्वन केले. तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत मिळवून देण्याचे त्यांनी आश्‍वासन दिले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salman Khan Firing: त्याने स्वतःला संपवलं नाही..अनुज थापरची हत्या? कुटुंबीयांच्या दाव्याने एकच खळबळ

ED: "जे काही चालले आहे ते अतिशय गंभीर आहे," कोर्टाने ईडीला का फटकारले? वाचा संपूर्ण प्रकरण

Heeramandi: हिरामंडी पाहिल्यानंतर 'या' कारणामुळे भडकला अभिनेता; म्हणाला, "इतका अन्याय का? निराशाजनक! "

SRH vs RR : आज पडणार धावांचा पाऊस! जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या राजस्थान रॉयल्सशी हैदराबादचा सामना

Latest Marathi News Live Update : अंधेरी पंप परिसरात मोठी आग, दारू दुकान जळून खाक

SCROLL FOR NEXT