उत्तर महाराष्ट्र

मैदान गाजवणाऱ्या विद्यार्थ्यांचे गुणपत्रकही वाढीव गुणांनी बोलणार!

संतोष विंचू

येवला : अवघ्या महिन्यातच शिक्षण विभागाने आपला निर्णय बदलवत क्रीडा, स्काऊट, एनसीसीतील गुणवंत विद्यार्थ्यांना सवलतीच्या गुणात वाढ केली आहे. महिन्यांपूर्वी यातील काही गुण कमी केले होते. मात्र वाढत्या विरोधामुळे यात वाढ केली आहे. यामुळे दहावी, बारावीतील गुणपत्रिकेत यंदापासून विद्यार्थ्यांना या गुणांचा लाभ मिळणार आहे.

राज्य सरकारने एप्रिल 2015 मध्ये माध्यमिक शालान्त (इयत्ता दहावी) आणि उच्च माध्यमिक शालान्त (इयत्ता बारावी) परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थी खेळाडूंना क्रीडा सवलतीचे वाढीव गुण देण्याचा निर्णय घेतला होता.परंतु काही त्रुटींमुळे बऱ्याच खेळाडूंना त्याचा लाभ मिळत नसल्याचे विविध क्रीडा संघटनांनी सरकारला कळविले होते.त्यामुळे 20 डिसेंबर रोजी शासनाने नव्याने नियमावली केली व स्वरूप बदलवत गुनात कपात केली होती.मात्र पुन्हा महिनाभरात राज्य सरकारने सुधारित नियमावली जाहीर केली आहे.  
क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या क्रीडा हॉकी फुटबॉल,केंद्र शासनाच्या क्रीडा व कल्याण विभागाच्या विभागीय क्रीडा, पॅरॅलींपिक्स कमिटी आयोजीत दिव्यांगाच्या स्पर्धा,तसेच स्कुल गेम फेडरेशन आयोजिय स्पर्धांना हे गुण मिळतील. याशिवाय राज्यस्तरावर महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागाच्या आणि राष्ट्रीय स्तरावर  शासनाने मान्यता दिलेल्या व आंतरराष्ट्रीय स्तरावर आलिम्पिक, एशियन,कॉमनवेल्थ तसेच फेडरेशन व शालेय महासंघाने आयोजित स्पर्धांसाठी हे गुण मिळणार आहे.

सर्व क्रीडा स्पर्धा या अधिकृत वार्षिक अजिंक्यपद स्पर्धा असायला हव्यात.तसेच जिल्हास्तरावरून थेट राज्यस्तरावर सहभाग असल्यास १० तर विभागस्तरावरून राज्यस्तरीय सहभाग असल्यास १२ गुण दिले जाणार आहे.

क्रीडा गुणाचे अनुज्ञेय स्वरूप असे..
स्तर  - प्राविण्य (प्रथम ते तृतीय) - इतर खेळाडू
जिल्हास्तर - 5 - 0
विभागस्तर - 10 - 5
राज्यस्तर - 15 - 10 किंवा 12 
राष्ट्रीयस्तर - 20 - 15 
आंतरराष्ट्रीय - 25 - 20 किंवा 15

एनसीसीसाठी वाढीव गुणाचे स्वरूप
- बेसिक लीडरशिप - 3 गुण
- पूर्व प्रजासत्ताक दिन शिबिर - 5 गुण
- प्रजासत्ताक दिन संचलन राष्ट्रीय स्तर शिबिर/स्पर्धा सहभाग - 10 गुण
- प्रजासत्ताक दिन राष्ट्रीय शिबिर/ स्पर्धा पदक विजेते - 15 गुण
- आंतरराष्ट्रीय युथ एक्सचेंज सहभाग - 20 गुण

 स्काऊट गाईडसाठी वाढीव गुण
- राज्यपाल पदक प्राप्त विद्यार्थी - 3 गुण
- राष्ट्रपती पदक,आंतरराष्ट्रीय जम्बोरी शिबीर सहभाग - 10 गुण 

"मागील महिन्यांत क्रीडा स्पर्धेतील वाढीव गुणांचे स्वरूप बदलवत गुणात मोठी कपात करण्यात आली होती.याविषयी शिक्षक संघटनांनी निवेदने देऊन हे विद्यार्थ्यांच्या हक्काच्या गुनात वाढ करण्याची मागणी केली होती.शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांना त्यांच्या श्रमाचे गुण देण्याचा चांगला निर्णय घेतला आहे मात्र काही स्तरावर अजूनही गुण कमी आहे, त्यात वाढ केली जावी."
- साहेबराव घुगे, जेष्ठ क्रीडा शिक्षक, येवला

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नाशिकचा सस्पेन्स संपला ! हेमंत गोडसे यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर, शांतिगिरी महाराजांना धक्का

iPhone Alarm issue : जगभरातील लोकांना आज उठायला झाला उशीर.. आयफोनचे अलार्म वाजलेत नाहीत! काय आहे कारण?

Rinku Singh : संघ निवडीबाबत मोठा खुलासा! BCCI च्या 'या' नियमामुळे रिंकूचे वर्ल्ड कप खेळण्याचे मिळाले स्वप्न धुळीस?

Traffic Noise: गाड्यांच्या आवाजामुळे वाढू शकतो हृदयविकार, डायबेटिस आणि स्ट्रोकचा धोका; धक्कादायक संशोधन समोर

Latest Marathi News Live Update: विदर्भ राज्य पार्टीच्या वतीने आज महाराष्ट्र दिवस हा काळा दिवस म्हणून पाळला जात आहे

SCROLL FOR NEXT