Senthwa Forestry officials with seized sagwan tree esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule : सेंधव्याजवळ 50 लाखांचे सागवान जप्त; विनापरवाना सुरू होती वखार

सकाळ वृत्तसेवा

शिरपूर (जि. धुळे) : मध्य प्रदेशातील सेंधवा तालुक्यांतर्गत चाचऱ्‍या गावात वन विभागाच्या अधिकाऱ्‍यांनी टाकलेल्या छाप्यात सुमारे ५० लाख रुपये किमतीचे सागवान लाकूड, फर्निचर व यंत्रसामग्री जप्त केली. अवैधरीत्या वखार चालवून तेथे फर्निचर तयार केले जात असल्याचे आढळले. जप्त केलेले सागवान सुमारे तीन वर्षे जुने असून, महाराष्ट्राच्या सीमेतून तोडून नेल्याचा संशय आहे. (Sagwan worth 50 lakh seized near Sendhwaya Vakhar started without license Dhule Latest Marathi News)

चार आयशर ट्रक, ट्रॅक्टर व पिक-अप भरून लाकूड वाहताना वन विभागाच्या कर्मचाऱ्‍यांची पुरती दमछाक झाली. २७ ऑगस्टच्या सायंकाळपासून २८ ऑगस्टच्या पहाटेपर्यंत ही कारवाई सुरू होती. आरा कटाई मशिन, कटर, सागवानी लाकडाच्या तुळ्या, चौकट असा मुद्देमाल या कारवाईत जप्त करण्यात आला.

सेंधवा वनवृत्ताचे वनमंडळ अधिकारी अनुपम शर्मा यांना चाचऱ्‍या गावात संशयित दिनेश शिवनाथ (वय ४५) अवैधरीत्या वखार चालवत असल्याची माहिती मिळाली होती. त्यांनी सहकाऱ्‍यांसह छापा टाकला. तेथील दृश्य पाहून अधिकारीही अवाक झाले.

संशयिताने सागवानापासून चौकट व अन्य फर्निचर तयार करून विक्रीचा उद्योग बिनबोभाट चालविला होता. लाकडाची पाहणी केल्यानंतर ते मध्य प्रदेश-महाराष्ट्राच्या हद्दीतील वृक्षतोड करून तस्करीद्वारे नेण्यात आल्याचा संशय अधिकाऱ्‍यांनी व्यक्त केला. सुमारे दोन ते तीन वर्षांपूर्वीचे लाकूड वखारीत असल्याचे दिसून आले. या मुद्देमालाची किंमत सुमारे ५० लाख रुपये आहे.

सांगवी विभाग झोपेत

मध्य प्रदेशालगत शिरपूरची हद्द असून, तेथील वृक्षराजीच्या संरक्षणासाठी सांगवी वन विभागाला जबाबदारी देण्यात आली आहे. मात्र वृक्षतोडीवर तेथील अधिकाऱ्‍यांचे कोणतेच नियंत्रण नसल्याची परिस्थिती आहे.

विशेष म्हणजे वृक्षतोड करून सागवानासारख्या मौल्यवान लाकडाच्या फळ्या तयार करून चक्क सायकलवरून वाहून नेल्या जातात, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे; परंतु आजवर सांगवी वनक्षेत्रातील कोणत्याच तस्कराला अटक करण्याची तसदी संबंधितांनी घेतलेली नाही.

तीन वर्षांपासून महाराष्ट्रातील लाकूड सेंधव्याच्या हद्दीतील दुर्गम गावापर्यंत पोचते आणि सांगवी कार्यालयाला त्याची कुणकुणही नसावी याविषयी आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News : दोन मुलांच्या आईचा तरुणावर जडला जीव, नकार मिळताच उचललं धक्कादायक पाऊल, नेमकं काय घडलं? वाचा...

flight caught fire mid-air VIDEO : उडत्या विमानात अचानक भडकली आग; प्रवाशांची आरडाओरड अन् पळापळ...

Western Railway: तिकीट काउंटरवरील लांबच लांब रांगा टळणार, मुंबई रेल्वेची नवी सुविधा, आता लोकलही राबवणार 'एसटी पॅटर्न'

PAK vs SA: बाबर आझमला फॉर्म सापडेना! टोनी डी झोर्झीने एका हाताने अफलातून कॅच घेत धाडलं माघारी, पाहा Video

Lakshmi Pujan 2025 Story: आपण लक्ष्मीपूजन का करतो? ही आहे त्यामागची आख्यायिका; शुभ मुहूर्तही जाणून घ्या

SCROLL FOR NEXT