Live Photo
Live Photo 
उत्तर महाराष्ट्र

ग्रामसेवक पतसंस्थेतर्फे 6.54 टक्के लाभांश : कैलासचंद्र वाक्‌चौरे

सकाळ वृत्तसेवा

नाशिक ः नाशिक जिल्हा ग्रामसेवक सहकारी पतसंस्थेला एक कोटी 31 लाखांचा नफा झाला आहे. तसेच 2019-20 साठी 6.54 टक्के लाभांश देण्यात येईल, असे पतसंस्थेचे सरचिटणीस कैलासचंद्र वाक्‌चौरे यांनी सांगितले. ग्रामसेवक भवनात काल (ता. 25) झालेल्या पतसंस्थेच्या 59 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. संस्थेचे अध्यक्ष साहेबराव आगवण अध्यक्षस्थानी होते. उपाध्यक्ष चांगदेव मुंडे, रवींद्र शेलार यांच्यासह संचालक उपस्थित होते. 
श्री. वाक्‌चौरे म्हणाले, की पतसंस्थेचे 1 हजार 279 सभासद आहेत. कर्जमर्यादा 9 लाख रुपये असून आकस्मिक कर्ज मर्यादा 25 हजार रुपये आहे. व्याजदर साडेआठ टक्के असून खेळते भागभांडवल 22 कोटी 48 लाख रुपयांचे आहे. संस्थेने 8 कोटी 79 लाख रुपयांचे कर्जवाटप केले आहे. वर्षाखेरीस कर्जवसुली 6 कोटी 21 लाखांची झाली आहे. 17 कोटी 79 लाखांचे कर्ज येणे आहे. एक कोटी 31 लाख म्हणजेच, थकबाकीचे प्रमाण 0.89 टक्के इतके आहे. सभासदांसाठी कल्याण निधी योजना सुरु करण्यात आली आहे. एखाद्या सभासदाचे निधन झाल्यावर वारसांना तत्काळ पाच लाखांची मदत दिली जाते. प्रत्येक सभासदाचा वीस लाखांचा अपघात विमा उतरवण्यात आला आहे. अपघातात निधन झालेल्या सभासदांच्या वारसांना 59 लाख 20 हजार देण्यात आले आहेत. 
संस्थेच्या सभासदांनी केलेली मागणी मंजूर करत अर्धा टक्का व्याजदर कमी करत कर्जमर्यादा दहा लाख रुपयांची करण्यात येत आहे, असे श्री. आगवण यांनी जाहीर केले. या वार्षिक सभेच्या निमित्ताने सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा गौरव निवृत्त अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप चौधरी आणि रवींद्र परदेशी यांच्या हस्ते करण्यात आला. राज्य ग्रामसेवक युनियनचे बापू अहिरे, जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष अरुण आहेर, जिल्हा ग्रामसेवक युनियनचे उपाध्यक्ष केशवराव इंगळे यांनी उपस्थितांशी संवाद साधला. 

पतसंस्थेचे संचालक मंडळ चांगले कामकाज करत असल्याने लेखापरीक्षणात संस्थेला "अ' वर्ग मिळाला आहे. जिल्ह्यातील ग्रामसेवक चोखपणे काम बजावत आहेत. माजी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांच्या सूचनेनुसार सुरु करण्यात आलेल्या बालविकास केंद्राची संकल्पना राज्यभर पोचली. स्वच्छ सर्वेक्षणमध्ये जिल्ह्याने चांगले काम केल्याने दिल्लीत गौरव झाला. त्यात ग्रामसेवकांचा मोठा वाटा राहिला.    -अनिल लांडगे (निवृत्त, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Onion Export: केंद्रानं खरंच कांदा निर्यातबंदी उठवली की केवळ निवडणूक जुमला? जाणून घ्या

DC vs MI, IPL: लाईव्ह सामन्यात पंतला आवरेना रोहितने हाती दिलेला पतंग उडवण्याचा मोह, Video Viral

Loksabha election 2024 : सभा घ्यायला आल्या अन् विकासाचा मुद्दा विसरुन गेल्या; प्रियांका गांधींनी मराठवाड्यासाठी शब्दही काढला नाही

Praniti Shinde : ''मविआची सत्ता असतानाही मंत्रिपदासाठी मी लॉबिंग केलं नाही , कारण...'' प्रणिती शिंदे नेमकं काय म्हणाल्या?

IPL 2024 LSG vs RR Live Score : शतकी भागीदारी रचणारी राहुल - हुड्डाची जोडी फुटली; लखनौ 150 च्या जवळपास पोहचली

SCROLL FOR NEXT