Live Photo
Live Photo 
उत्तर महाराष्ट्र

सेवानिवृत्त अन आदिवासींची पूरग्रस्तांना मदत

सकाळ वृत्तसेवा

नाशिक ः राज्य सरकारी आणि निमसरकारी सेवेतील निवृत्तांनी सामाजिक बांधिलकीतून "सकाळ रिलीफ फंड'मध्ये दहा हजार रुपयांचा धनादेश आज जमा केला. नाशिक जिल्हा सेवानिवृत्त सेवक संघटनेचे अध्यक्ष माधवराव भणगे यांच्या स्मरणार्थ पूरग्रस्तांसाठी ही मदत देण्यात आली. 
संघटनेचे उपाध्यक्ष रवींद्र थेटे, कार्याध्यक्ष उत्तमबाबा गांगुर्डे, सरचिटणीस मधुकर कांगणे, खजिनदार अशोक मानकर यांनी धनादेश "सकाळ'च्या उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे संपादक श्रीमंत माने यांच्याकडे सुपुर्द केला. यावेळी दिलीप पाटील, दिनकर ठाकरे, रमेश पाटील, जगनराव गायकवाड, आर. एन. भट, विश्‍वास पुराणिक, मुकुंद कुलकर्णी, अनिल गोसावी हे उपस्थित होते. श्री. गांगुर्डे म्हणाले, की कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यात पूराने हाहाःकार उडावला असताना (कै.) भणगे यांनी पूरग्रस्तांना मदत करण्याविषयी सांगितले होते. त्यांच्या सूचना करत असताना स्वतःचा निधी संघटनेकडे दिला. मदत निधी संकलनाची बैठक सुरु असताना त्यांच्या निधनाची माहिती मिळाली. म्हणूनच त्यांच्या स्मरणार्थ निधी देण्याचे संघटनेतर्फे ठरवण्यात आले आहे. 

देवडोंगराच्या आदिवासींनी दिले तांदूळ 
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी देवडोंगरा (ता. त्र्यंबकेश्‍वर) येथील आदिवासींनी तांदूळ संकलित केला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी धान्य संकलनाबद्दल विनंती करताच, आदिवासींनी दोनशे किलो तांदूळ संकलित करत "सकाळ'चे वितरक संदीप बत्तासे यांच्याकडे "सकाळ रिलीफ फंड'मध्ये जमा करण्यासाठी दिला. स्वामी सर, पवन गावीत, दिलीप भसरे, केशव पवार, नितेश पवार, भूषण चौधरी, समीर पवार, अंबादास पवार, उत्तम मौळे, विठ्ठल पवार, गणेश भसरे यांनी हा तांदूळ जमा केला. 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT