Residential photo
Residential photo 
उत्तर महाराष्ट्र

सिव्हिलच्या प्रसुती विभागाची केंद्रीय समितीकडून पाहणी 

सकाळ वृत्तसेवा

नाशिक  : केंद्राच्या "लक्ष्य' या महत्त्वाकांक्षी उपक्रमांतर्गत राष्ट्रीय गुणवत्ता आश्‍वासन समितीने आज (ता.3) जिल्हा शासकीय रुग्णालयातील प्रसुति विभागाची पाहणी करीत समाधान व्यक्त केले. केंद्रीयस्तरावरून नाशिक जिल्हा रुग्णालयाची निवड करण्यात आली असून, येत्या काळात सदरचा विभाग अधिक गुणवत्तापूर्वक होण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. 

केंद्रशासनाच्या आरोग्य विभागाचा "लक्ष्य' हा महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे. याअंतर्गत शासकीय आरोग्य सेवा अधिक गुणवत्तापूर्वक होण्यासाठी भर दिला जातो आहे. त्याच अनुषंगाने आज राष्ट्रीय गुणवत्ता आश्‍वासन समितीचे तज्ज्ञ डॉ. जयानंद, डॉ. श्रीमती चित्रा यांनी नाशिक जिल्हा सरकारी रुग्णालयास भेट देत पाहणी केली. 
केंद्र शासनाच्या लक्ष उपक्रमांतर्गत राज्यातील अधिक प्रसुतीची संख्या असणाऱ्या शासकीय रूग्णालयांची निवड करण्यात आली आहे. यात नाशिक जिल्हा रुग्णालयाचा समावेश आहे. जिल्हा रूग्णालयांची प्रसुतींबाबत सध्याची गुणवत्ता तपासणे व गुणवत्तेमध्ये अधिक वाढ करण्यासाठी विविध उपायोजना राबविणे असे या उपक्रमाचे उदिष्ट आहे. 
नाशिक जिल्हा रूग्णालय प्रसुतींमध्ये आघाडीवर असून दर महिन्याला सरासरी 700 ते 750 प्रसुती होतात. तर बहूतांश प्रसुती या नैसर्गिक करण्यावर येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांचा प्रयत्न असतो. अधिक गुंतागुंतीच्या प्रसुतीच शस्त्रक्रियेद्वारे (सिजिरियन) केल्या जातात. महिन्याला सरासरी 200 ते 250 प्रसुती या शस्त्रक्रियेद्वारे होतात. राज्यातील शासकीय रूग्णालयांच्या तुलनेत नाशिक जिल्हा रुग्णालयात प्रसुतीचे प्रमाण अधिक आहे. यामुळे केंद्रीय समितीने तब्बल 10 तास रूग्णालातील प्रसुती गृह, प्रसुती पश्‍चात माता कक्ष, आंतररूग्ण विभाग, प्रसुती शस्त्रक्रिया विभागाची सुक्ष्म पाहणी केली. 
यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निखिल सैंदाणे, प्रसुती विभागाचे डॉ. योगेश गोसवी, डॉ. सोनाली गायकवाड, डॉ. धनश्री पत्तटील, डॉ. प्रमोद चौधरी, परिचारिका प्रमुख सीमा काळे, प्रसुती कक्षाचे कर्मचारी उपस्थित होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा ना'पाक' कृत्य! जम्मू-काश्मीरमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवाद्यांचा हल्ला

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

IPL 2024 RCB vs GT Live Score: विराटचा डायरेक्ट थ्रो अन् गुजरातचा निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

Latest Marathi News Live Update: बाळासाहेबांना हिंदूहृदयसम्राट म्हणा- उद्धव ठाकरे

SCROLL FOR NEXT