live photo
live photo 
उत्तर महाराष्ट्र

वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्यांवर लवकरच कारवाईचा बडगा 

सकाळ वृत्तसेवा

पोलीस आयुक्तांनी व्यावसायिक, विद्यार्थी, वाहनचालकांशी साधला संवाद 


नाशिक  : अशोकस्तंभ, रविवार कारंजा येथील व्यावसायिकांच्या अतिक्रमणामुळे होणारी वाहतूक कोंडी, शालिमार चौकात अनधिकृत हॉकर्स, रस्त्याच्या मधोमध थांबणाऱ्या शहर बसेस, अनधिकृत रिक्षाथांबे यामुळे होणाऱ्या वाहतुकीच्या कोंडी थेट "आँखो देखा हाल' पोलीस आयुक्तांनी आज अनुभवली. यावेळी आयुक्‍तांनी वाहतूक शाखा, महापालिका संयुक्तपणे मोहीम राबवून नो-हॉकर्स, नो-व्हेइकल झोन निश्‍चित करणे, अनधिकृत रिक्षाथांब्यांवर कारवाई, अनधिकृत हॉकर्सवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. 

शहराच्या मध्यवस्तीमध्ये वाहतूक कोंडीची वाढती समस्येची दखल गांभीर्याने घेत, आज (ता.3) सायंकाळी पोलीस आयुक्त विश्‍वास नांगरे पाटील यांनी स्वत: कोंडीच्या ठिकाणी भेट देत व्यावसायिक, विद्यार्थी, वाहनचालकांशी संवाद साधला. अशोकस्तंभ, रविवार कारंजा, शालिमार चौक, गडकरी सिग्नल, त्र्यंबकनाका, सीबीएस यासह वाहतूक कोंडीच्या ठिकाणी थांबून आढावा घेतला. यावेळी वाहतूक शाखेच्या उपायुक्त पौर्णिमा चौघुले-श्रींगी, सहाय्यक आयुक्त मंगलसिंह सूर्यवंशी, पोलीस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे यांच्यासह वाहतूक शाखेचे अधिकारी उपस्थित होते. 
यावेळी पोलीस आयुक्त विश्‍वास नांगरे पाटील यांचा ताफा शालिमार चौकात आला असता, सायंकाळची वेळ असल्याने विद्यार्थी शहर बसची प्रतिक्षेत होते. तर बसेसही बसथांब्याची जागा सोडून रस्त्याच्या मधोमध थांबत होत्या. त्यामुळे चौकात वाहतुकीची कोंडी होत होती. त्यात भर अस्थाव्यस्त थांबलेल्या रिक्षा. त्याची गंभीर दखल घेत आयुक्तांनी अनधिकृत रिक्षाथांब्यावर कारवाई करण्याच्या सूचना केल्या. तसेच, शहर बस व्यवस्थापन-वाहतूक शाखेची बैठक घेऊन नियमाप्रमाणेच बसेस व गर्दीच्या मार्गावर जादा बसेसचे नियोजन करण्याच्या सूचना केल्या. 

आयुक्तांच्या सूचना 
* अनधिकृत हॉकर्सवर कारवाई 
* रस्त्यालगतच्या व्यावसायिकांच्या अतिक्रमणावर कारवाई 
* व्यावसायिकांकडूनच वाहनांची पार्किंग करून कोंडी होत असल्यास कारवाई 
* मनपाच्या मदतीने अतिक्रमणावर कारवाई 
* अनधिकृत रिक्षाचालकांवर कारवाई 
* रिक्षाथांब्याबाबत मनपाशी चर्चा करून नियोजन 
* नो-हॉकर्स, नो-व्हेईकल झोन निश्‍चित करणे 
* शालिमार चौकात बसेस थांब्याजवळच थांबतील, महामंडळाकडे पाठपुरावा 

 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT