live photo
live photo 
उत्तर महाराष्ट्र

चिमुकलीचा हट्ट अन्‌ बोटाला शाई 

सकाळ वृत्तसेवा

बालहट्ट तो बालहट्टच... 

नाशिक : राजहट्ट, स्त्रीहट्ट अन्‌ बालहट्ट म्हटला की तो पुरवावाच लागतो असे नेहमीच बोलले जाते. त्याचीच प्रचिती आज गंगापूर रोडवरील एका मतदान केंद्रात आली. आईसोबत मतदान केंद्रावर आलेल्या चिमुकलीने, तिची आई मतदान करून बाहेर आल्यानंतर तिनेही आईने केले त्याचप्रमाणे तिलाही मतदानाचा हक्क बजवायचा होता. त्यासाठी ती हटूनच बसली. ही बाब मतदान केंद्र निरीक्षकाच्या ध्यानात आली आणि त्यांनी अखेर तिचा मतदानाचा "बालहट्ट' पुरा केला. त्यानंतर मात्र त्या चिमुकलीने आनंदाने हसत हसत मतदान केंद्र सोडले. 

अद्विता गिरी असे या चिमुकलीचे नाव. गंगापूर रोडवरील वाघ गुरुजी शाळेमध्ये विधानसभा निवडणुकीचे मतदान केंद्र होते. आज सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास अद्विता ही अवघ्या अडीच-तीन वर्षांची चिमुकली तिची आई आणि आजोबांसोबत मतदान केंद्रात आली. आई अन्‌ आजोबांनी मतदानाचा हक्क बजावला आणि ते तिच्यासह बाहेर आले. परंतु अद्विताने तिच्या आईकडे हट्ट धरून बसली. 
हट्ट काय तर, जसे तिच्या आईने बोटाला शाई लावून मतदान यंत्रावर जाऊन मतदान केले; अगदी तसेच तिलाही करू का दिले नाही म्हणून ती रडू लागली. तिच्या आईने आणि आजोबांनी समजून काढत शाळेच्या प्रवेशद्वाराबाहेर आणले. परंतु अद्विता काही ऐकेना. त्याकरीता ती रडूही लागली. यावेळी शाळेच्या प्रवेशद्वाराबाहेर पोलिसांचा फौजफाटयासह मतदान केंद्राचे निरीक्षक होते. 
त्या निरीक्षकाचे चिमुकल्या अद्विताकडे पाहतच होते. त्यांच्या लक्षात तिचा हट्ट आला आणि ते तिच्याजवळ गेले आणि "चल, आपण आईने केले तसेच करू' असे म्हणता, अद्विताच्या चेहरा खुलला. अद्विताने लगेच आईचे बोट सोडले आणि निरीक्षकांचे बोट पकडून मतदान केंद्राच्या दिशेने चालू लागली. त्यांनीही तिचा तो हट्ट पुरविताना, केंद्रात नेऊन तिच्या बोटाला शाई लावली आणि आतून फिरवून आणून परत तिच्या आईकडे सोपविले. तेवढे केल्याने अद्विता कमालीची खूश झाली होती. त्या आनंदातच तिने आई ÷अन्‌ आजोबांसोबत निघून गेली. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT