Residential photo
Residential photo 
उत्तर महाराष्ट्र

नाशिक शहर-जिल्ह्यात कडेकोट पोलीस बंदोबस्त 

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : विधानसभा निवडणुकीसाठी उद्या (ता.21) मतदान होते आहे. त्यापार्श्‍वभूमीवर नाशिक शहर व जिल्ह्यात चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. पोलीस आयुक्तालय हददीमध्ये व जिल्ह्यात पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांसह होमगार्ड, राज्य राखीव दला, केंद्रीय सुरक्षा दलाच्या तुकड्या असा सुमारे 10 हजार 500चा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. तसेच, संवेदन-अतिसंवेदनशिल भागाला तर छावणीचे स्वरुप प्राप्त झाले असून कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची सतर्कता बाळगली जात आहे. 

नाशिक शहरात 1 हजार 154 बूथ असून यासाठी 254 इमारतींचा वापर करण्यात आला आहे. याठिकाणी 735 पोलीस व 577 होमगार्डची नियुक्ती करण्यात आली आहे. शहरात एकूण 33 मतदान केंद्र ही संवेदनशील असून याठिकाणी विशेष बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. शहरात कोठेही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस आयुक्त विश्‍वास नांगरे-पाटील यांच्यासह उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहायक निरीक्षक, राखीव दल, केंद्रीय राखीव सुरक्षा दल, होमगार्ड असा एकूण 4 हजार 500 जवानांचा कडेकोट बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. 

जिल्ह्यात 3 हजार 423 मतदान केंद्र असून 32 मतदान केंद्र संवेदनशील आहेत. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी याठिकाणी सशस्त्र पोलीस-राखीव दलाचा फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे. जिल्ह्यात तालुकास्तरावर मतदान प्रक्रिया सुरळीत व शांततेत पार पाडण्यासाठी ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांच्या नेतृत्वाखाली चोख बंदोबस्ताचा ऍक्‍शन प्लॅन तयार केला गेला आहे. यानुसार पोलीस अधीक्षकांसह 2 अपर पोलीस अधीक्षक, 12 उपअधीक्षक, 43 पोलीस निरीक्षक, 118 सहायक निरीक्षक-उपनिरीक्षक, 2 हजार 874 पोलीस कर्मचारी, 2 हजार 526 होमगार्ड, गुजरातचे 800 होमगार्ड, 5 सीआरपीएफच्या तुकड्या, 3 जीएसआरपीएफच्या तुकड्या, 3 सशस्त्र रेल्वे पोलीस दलाच्या तुकड्या असा सुमारे 6 हजार 500 पेक्षा अधिक फौजफाटा जिल्ह्यात तैनात आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baramati Lok Sabha Election : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचाही पलटवार; पंजाबची गळती सुरू जवळपास निम्मा संघ गारद

Loksabha election 2024 : ''आम्ही खोक्यांच्या मागे गेलो नाहीत; कारण...'', 'सकाळ'च्या मुलाखतीत विनायक राऊत स्पष्टच बोलले

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेचा भगवान कुबेरांशी काय संबंध आहे? जाणून घ्या कारण

SCROLL FOR NEXT