उत्तर महाराष्ट्र

सुरक्षिततेची "किऑक्‍स' यंत्रणा आज होणार कार्यान्वित 

सकाळ वृत्तसेवा

देशातील पहिला प्रयोग नाशिकमध्ये : सिटी सेंटर मॉल सिग्नलजवळ पहिले किऑक्‍स; टप्प्याटप्प्याने शहरभर 

नाशिक : वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांसह, महिला-युवतींच्या सुरक्षितेतच्या दृष्टिकोनातूनही उपयुक्त अशी "किऑक्‍स' यंत्रणा शहरात कार्यान्वित केली जाणार आहे. देशातील पहिला प्रयोग असून, उंटवाडी रोडवरील सिटी सेंटर मॉल सिग्नल येथे किऑक्‍स यंत्रणा बसविण्यात येणार असून, उद्या (ता.9) सकाळी साडेदहा वाजता पोलीस आयुक्त विश्‍वास नांगरे-पाटील, महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते उद्‌घाटन केले जाणार आहे. 

शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधिततेसाठी किऑक्‍स यंत्रणा ही अत्यंत प्रभावी मानली जाते आहे. सायबर पोलीस ठाण्यासह शहर पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये 13 पोलीस ठाणे असून 259.12 चौ.किमी. शहराचे क्षेत्रफळ आहे. पोलीस आयुक्तालयात 214 पोलीस अधिकारी, 3 हजार 31 हजार पोलीस कर्मचारी आहेत. तर दुसरीकडे शहराच्या लोकसंख्येनुसार, 804 नागरिकांमागे 1 पोलीस कर्मचारी असे प्रमाण आहे. राज्यात हेच प्रमाण 604 नागरिकांमागे 1 असे आहे. यामुळे शहराच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांना तारेवरची कसरतच करावी लागते. मात्र, आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात पोलिस यंत्रणाही आधुनिक होते आहे. चोख सुरक्षितता आणि गुन्हेगारीवर नियंत्रणासाठी स्मार्ट पोलिसिंग महत्त्वाची आहे. त्याच उद्देशाने पोलिसांसाठी "किऑक्‍स' यंत्रणा उपयुक्त ठरू शकणारी आहे. 
पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये सिटी सेंटर मॉल सिग्नलवर किऑक्‍स यंत्रणा बसविली जाणार आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने आयुक्तालय हद्दीतील 13 पोलीस ठाण्याअंतर्गत ही यंत्रणा कार्यान्वित केली जाणार आहे. यासाठी किऑक्‍स यंत्रणेशी संबंधित अधिकारी आणि पोलीस शहरात सर्वेक्षण करून ही यंत्रणा बसविणार आहेत. 

अशी आहे किऑक्‍स यंत्रणा 
किऑक्‍स यंत्रणा म्हणजे संकंटकालिन/आपत्कालिन परिस्थिती हमखास मदतीची यंत्रणा. मशिनवर असलेले एक पॅनिक बटन आणि त्यामध्ये उच्चदर्जाचा कॅमेरा असून, जो 24 तास कार्यान्वित असेल. सिग्नलवरील घटनांची बारकाईने नोंद होणार आहे. महिला, युवतीची छेडखानी झाल्यास, तिने किऑक्‍सचे बटन दाबल्यास तात्काळ त्याची सूचना पोलीसांसह संबंधित यंत्रणेला मिळेल आणि काही मिनिटात त्याठिकाणी मदत पोहोचू शकेल. छेडखानीचे चित्रीकरणही त्यात कैद होऊ शकते. ज्यामुळे पोलिसांना कारवाई करणे शक्‍य होणार आहे. किऑक्‍सची वयोमर्यादा 5 वर्षापर्यंत असून या काळात सुमारे 50 लाख नागरिकांपर्यंत पोहोचणे आणि पाच लाख वाहनांवर नजर ठेवण्याचे ध्येय आहे. भविष्यात याच यंत्रणेवरून कॉलिंगचीही सुविधा उपलब्ध होण्याची शक्‍यता आहे. 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT