live photo
live photo 
उत्तर महाराष्ट्र

पीएमसी बॅंकेच्या व्यवहारावर रिझर्व बॅंकेने आणले निर्बंध 

सकाळ वृत्तसेवा

हवालदिल झालेल्या ग्राहकांच्या डोळ्यात आसू  ; हजार रुपयेच काढता येणार 

नाशिक : पंजाब-महाराष्ट्र को-ऑप. बॅंकेच्या लेखापरिक्षणात (ऑडिट) त्रुटी निदर्शनास आल्याने रिझर्व बॅंकेने (आरबीआय) बॅंकेवर निर्बंध आणले आहेत. त्यामुळे आगामी सहा महिन्यांसाठी बॅंकेच्या खातेदारांना फक्त एक हजार रुपयेच काढता येणार आहे. त्यामुळे शहरातील सुमारे साडे आठ हजार बॅंक खातेदारांसमोर आर्थिक अडचणींचा डोंगर उभा राहिला आहे. मुलाच्या ÷उच्च शिक्षणासाठी 1 हजार पुरेसे आहेत का? गृहकर्ज घेतलेल्यांना हप्ता कसा द्यायचा तर काही तासांपूर्वीच लाखो रुपयांचा धनादेश बॅंकेत जमा केल्या असून त्याचे पुढे काय, असे एक ना अनेक प्रश्‍न उपस्थित करीत बॅंकेच्या खातेदारांच्या डोळ्यातून आसवाच्या धारा वाहू लागल्या. पण, बॅंकेच्या शाखाव्यवस्थापक निशब्द होत्या. 
 
पंजाब-महाराष्ट्र को-ऑप. बॅंकेच्या खातेदारांच्या मोबाईलवर आज सकाळी अचानक बॅंकेचे संदेश धडकले आणि खातेदारांचे धाबेच दणाणले. खातेदारांनी काही मिनिटांमध्ये कुलकर्णी गार्डन समोरील बॅंकेत पोहोचले असता, त्याठिकाणी प्रदर्शनी ठिकाणी भारतीय रिझर्व बॅंकेने बजावलेल्या नोटिसीची प्रत चिकटविण्यात आली होती. त्यानुसार, बॅंकेवर आरबीआयने बॅंकेच्या अधिनियमाच्या 35 अ कलमान्वये आर्थिक व्यवहारांवर निर्बंध आणले आहेत. त्यानुसार, बॅंके खातेदारास आगामी सहा महिन्यात फक्त 1 हजार रुपयेच काढता येणार आहेत. 
बॅंके खातेदारांना मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या खातेदारांनी शाखाधिकारी रजिंदर कौर यांना घेराव घालत जाब विचारला. कोणी त्यांच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी पैसा कसा द्यायचा, तर कोणी घरासाठी कर्ज मंजूर केले असून ते आता खात्यात अडकून पडले आहे. कोणाचा कर्जाचा हप्ता असून तो कसा फेडायचा तर काहींचे पगारचे खातेच या बॅंकेत आहे त्यांचे घर हजार रुपयात चालणार का, असे एक ना अनेक प्रश्‍न उपस्थित करीत खातेदारांनी आपल्या भावना आसवातून वाट मोकळी करून दिली. 

तणावपूर्ण स्थिती 
अवघ्या काही तासापूर्वी लाखो रुपये बॅंकेत भरल्यानंतर आज सकाळी बॅंकेवर निर्बंध आल्याचे कळताच अनेकांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यामुळे अशा काही खातेदारांना शाखाधिकाऱ्यांकडे लाखो रुपयांचा धनादेश परत देण्याची मागणी केली. त्यामुळे बॅंकेच्या कार्यालयात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. खातेदारांमध्ये महिला, ज्येष्ठ नागरिक, व्यावसायिक आणि विद्यार्थ्यांचा समावेश होता. अखेरीस सरकारवाडा पोलिस ठाण्याचे पथक दाखल झाल्यानंतर तणावाची परिस्थिती निवळली. 

ऑडिटमधील त्रुटीमुळे ओढावली परिस्थिती 
आरबीआय बॅंकेने पीएमसी बॅंकेचे केलेल्या ऑडिटमध्ये त्रुटी आढळली आहे. ती त्रुटी दूर करण्यासाठी आरबीआयने सहा महिन्यांची मुदत बॅंकेला दिली आहे. तोपर्यंत, बॅंकेच्या आर्थिक व्यवहारांवर निर्बंध लादण्यात आलेले आहेत. दरम्यान, पीएमसी बॅंकेच्या बचत खात्यावरील रक्कमेवरही जादा व्याजदार असल्याची चर्चा होती. याच कारणावरून आरबीआयने निर्बंध लादले असावेत अशी शक्‍यता व्यक्त होते आहे. 

माझे याच बॅंकेत खाते असून यात जमा असलेल्या पैशांवरच मुलाचे इंजिनिअरिंगचे शिक्षण सुरू आहे. सहा महिन्यात फक्त एक हजार रुपयात त्याच्या शिक्षणाचा प्रश्‍न सुटणार आहे का? मुलाचे शिक्षण अडचणीत आले आहे. 
- पूजा कोठुळे, खातेदार. 

गेल्या महिन्यात 7 लाख रुपयांचे कर्ज नील केले. सोमवारी (ता.23) दुपारी चार वाजता 2 लाखांचा धनादेश बॅंकेत जमा केला. तो वटल्यानंतर त्यावर आधारित काही कामे आहेत. ती ठप्प होणार आहे. शिवाय, खात्यावर 5 लाख रुपये आहेत. कसा व्यवसाय करणार? मला माझा धनादेश परत पाहिजे. एका रात्रीत बॅंकेवर निर्बंध येऊ शकत नाहीत. बॅंकेला सारे माहिती आहे परंतु खातेदारांची फसवणूक केली आहे. 
- गोपाळ सोनार, खातेदार. 

पीएमसी बॅंकेच्या शहरात शाखा : दोन 
बॅंकेचे खातेदार : सुमारे साडेआठ हजार 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weather Updates: मे महिन्यातही सूर्य आग ओकणार! पावसासंदर्भातही मोठी अपडेट; IMD ने काय सांगितलं?

Google Layoffs : गुगलमधील कर्मचारी कपात सुरूच.. कोअर टीममधून 200 जणांना नारळ! भारत-मेक्सिकोमध्ये देणार संधी

Shyam Rangeela: मेरे प्यारे देशवासियो... मोदींची मिमिक्री करत प्रसिद्ध झालेल्या कॉमेडियनचे वाराणसीतून पंतप्रधानांना आव्हान

CSK vs PBKS : 'सेल्फिश' धोनी! शेवटच्या ओव्हरमधील ड्राम्यानंतर थाला होतोय ट्रोल, Video Viral

Share Market Today: शेअर बाजार उघडताच 'या' शेअर्सवर ठेवा लक्ष; काय आहे तज्ज्ञांचा अंदाज?

SCROLL FOR NEXT