Residential photo
Residential photo 
उत्तर महाराष्ट्र

नाशिक जिल्हा मलेरिया अधिकारी लाच घेताना जेरबंद 

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : पडताळणीमध्ये एक वेतनवाढ कमी दिल्या गेल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्याचे बिल मंजूर करण्यासाठी 15 हजार रुपयांची लाच घेणाऱ्या जिल्हा मलेरिया अधिकाऱ्यास रंगेहाथ अटक करण्यात आली. महेंद्र बबनराव देवळीकर असे लाचखोर अधिकाऱ्याचे नाव आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने संदर्भ सेवा रुग्णालयाच्या कार्यालयातच सदरची कारवाई केली. 

तक्रारदाराच्या तक्रारीनुसार, त्यांना 1986 ते 1992 या कालावधीतील एक वेतनवाढ कमी देण्यात आली होती. सदरची बाब तक्रारदार हे 2013 मध्ये निवृत्त झाले असता, त्यावेळी वेतन पडताळणीमध्ये निदर्शनास आली होती. त्यासंदर्भातील फरकाचे बिल जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयाकडे मंजुरीसाठी तक्रारदाराने सादर केले होते. तक्रारदाराचे सदरचे बील मंजूर करण्यासाठी लाचखोर जिल्हा हिवताप अधिकारी महेंद्र देवळीकर याने 20 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. 
यासंदर्भात तक्रारदाराने आज (ता.16) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार पथकाने शहानिशा केल्यानंतर, आज दुपारी लाचेची 15 हजार रुपयांची रक्कम देण्याचे निश्‍चित करण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने संदर्भ सेवा रुग्णालयाच्या आवारात असलेल्या मलेरिया अधिकाऱ्याच्या कार्यालयात सापळा रचला आणि ठरल्याप्रमाणे, लाचखोर महेंद्र देवळीकर यास त्याच्या कार्यालयात 15 हजार रुपयांची लाच स्वीकारताना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी भद्रकाली पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT