shevale
shevale 
उत्तर महाराष्ट्र

साकोरा - मनसे कार्यकर्ते विशाल शेवाळे यांची आत्महत्या

सकाळवृत्तसेवा

नांदगाव / साकोरा - मनसेच्या विद्यार्थी आघाडीचे तालुकाप्रमुख विशाल शशिकांत शेवाळे (२३) यांचे दुपारी निधन झाले. विशाल यांनी नाशिकरोडला धावत्या रेल्वे मालगाडी समोर स्वतःला झोकून दिले. त्यांनी केलेल्या आत्महत्येचे वृत्त कळताच साकोरा व तालुक्यात विशेषतः युवा वर्गात हळहळ व्यक्त होत आहे.

अतिशय उमद्या व उदयोन्मुख तरुण नेतृत्वाचा असा अकाली अंत झाल्याची ही दु:खद घटना घडली. राज्य-जिल्हास्तरावरील निबंध वक्तृत्व स्पर्धेत आपल्या प्रतिभावान शैलीचा ठसा त्यांनी उमटविला होता. त्यांच्यातील या गुणांना हेरून मनसेने तालुक्याच्या विद्यार्थी आघाडीची तालुकाध्यक्षपदाची अडीच महिन्यापूर्वी सोपविली होती. विशाल शेवाळेच्या घरची परिस्थिती हलाखीची असूनही कष्ट करीत शिक्षण घेण्याचे गुणवैशिट्य असल्याने त्यांनी डिएड पदवी मिळविली. सिन्नर येथिल के.एस्.बी.पंप्प या खाजगी कंपनीत काम करून यशवंत मुक्त विद्यापीठातून बाहेरून शिक्षण घेत होता. तसेच निबंध स्पर्धेत जिल्हास्तरीय प्रथम क्रमांकाने गौरविण्यात आले होते. सांयकाळी उशिरा विशाल यांच्या पार्थिवाववर मोठ्या शोकाकुल वातावरणात अंत्यविधी करण्यात आला यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Lok Sabha Ground Report: राम सातपुतेंना धक्का बसणार की प्रणिती शिंदेंना? वंचित गेम चेंजर ठरणार...ग्राऊंड रिपोर्ट वाचा...

IPL Revenue: IPLचे भविष्य संकटात! संघांच्या कमाईत झाली मोठी घसरण; काय आहे कारण?

जे कुटुंबाला सांभाळू शकत नाहीत ते महाराष्ट्राला काय सांभाळणार?; PM मोदींची पवारांवर कडवट टीका

Bhima Koregaon Case: भीमा कोरेगाव प्रकरणात ट्विस्ट, दिल्ली विद्यापीठाचे माजी प्राध्यापक हनी बाबू यांनी मागे घेतला जामीन अर्ज

Bollywood News: व्हॅनिटी व्हॅन, स्टायलिस्ट अन् भरमसाठ फी! फिल्मस्टारवर एका दिवसाला किती पैसे होतात खर्च? वाचून व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT