BJP
BJP 
उत्तर महाराष्ट्र

खानदेशात समता परिषदेला खिंडार

प्रा. भगवान जगदाळे

निजामपूर-जैताणे (धुळे) : खानदेशात अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेला खिंडार पडल्याचे मानले जात असून गुरुवारी (ता.1) धुळे, नंदुरबार व जळगाव जिल्ह्याच्या तिन्ही विद्यमान जिल्हाध्यक्षांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईत कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला. तत्पूर्वी जिल्हाध्यक्ष देवेंद्र पाटील (धुळे), अशोक माळी (नंदुरबार), डॉ.प्रताप महाजन (जळगाव) यांनी मंत्रालयात कार्यकर्त्यांसमवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत चर्चा केली.

विश्वासात न घेतल्याचा आरोप..
वरिष्ठांनी समता परिषदेच्या आगामी जिल्हा कार्यकारिणीत फेरबदलाबाबत आमची मते जाणून घेतली नाहीत. तसेच बापूसाहेब भुजबळ, भुजबळांचे स्वीय सहाय्यक रविभाऊ सोनवणे यांनी शहादा (जि.नंदुरबार) व सोनगीर (जि.धुळे) येथे आगामी 4 नोव्हेंबरला होणाऱ्या फुले दांपत्याच्या पुतळा अनावरण व समता मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या आढावा बैठकाही परस्पर घेतल्या. त्याबाबत आपल्याला विश्वासात घेतले नसल्याचेही संबंधित जिल्हाध्यक्षांनी 'सकाळ'शी बोलताना सांगितले.

समता परिषदेच्या धुळे जिल्हाध्यक्षपदासाठी देवेंद्र पाटील पुन्हा इच्छुक होते. त्यांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादी ओबीसी सेलचे धुळे जिल्हाध्यक्ष संजय खैरनार व कार्यकर्त्यांनी देवेंद्र पाटील यांच्या फेरनिवडीबाबत थेट भुजबळांना तसे पत्रही पाठवले होते. परंतु त्याआधीच देवेंद्र पाटील यांनी भाजपात प्रवेश केल्याने समता सैनिकांसह संजय खैरनार यांनीही आश्चर्य व्यक्त केले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री छगन भुजबळ नेमकी काय भूमिका घेतात? व समता परिषदेत नेमक्या काय घडामोडी घडतात? याकडे समता सैनिकांसह जाणकारांचे लक्ष लागून आहे.

"माजी मंत्री तथा समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष छगन भुजबळ अटकेत असताना आपण धुळे-नंदुरबार-जळगाव जिल्ह्यातील समता सैनिकांचे मनोबल वाढवून त्यांना सातत्याने विविध आंदोलनात सहभागी करून घेत शासनावर दबाव निर्माण करून भुजबळांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलो होतो. त्यावेळी काही पदाधिकारी मात्र कोपऱ्यात लपून बसले होते. भुजबळांसाठी गेल्या पंधरा वर्षांहून अधिक काळ तन-मन-धनाने काम केले. परंतु सद्या आमच्याकडेच दुर्लक्ष केल्याने नाईलाजास्तव आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला."
- देवेंद्र पाटील, जिल्हाध्यक्ष, समता परिषद, धुळे जिल्हा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Telangana CM Revanth Reddy : तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना दिल्ली पोलिसांचं समन्स; अमित शाहांच्या व्हिडीओचं प्रकरण

Sairat Complete 8 Years : मराठी सिनेमाला १०० कोटींचं स्वप्न दाखवणाऱ्या 'सैराट'ला ८ वर्षं पूर्ण; रिंकूची पोस्ट चर्चेत

Share Market Closing: शेअर बाजारात तुफान तेजी; सेन्सेक्स 900 अंकांच्या उसळीसह बंद, गुंतवणूकदार मालामाल

Latest Marathi News Live Update: कोणतेही काम करण्यापूर्वी मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थानी जातो: PM Modi

Nashik News : मालेगावी भाजीपाल्याची आवक स्थिर! मे, जून महिन्यात उत्पादन घटण्याचा अंदाज

SCROLL FOR NEXT