मोसम नदीपात्रात वाळू माफियांची धुडगूस सुरूच...
मोसम नदीपात्रात वाळू माफियांची धुडगूस सुरूच... 
उत्तर महाराष्ट्र

मोसम नदीपात्रात वाळू माफियांची धुडगूस सुरूच...

दीपक खैरनार

अंबासन, (जि. नाशिक): मालेगाव तालुक्यातील वळवाडे शिवारात असलेल्या मोसम नदीपात्रातील अवैधरित्या वाळू उपसा वाळू माफियाचा धुडगूस सुरूच असल्याने 'पाणी मुरतेय तरी कुठे' असा संतप्त सवाल नागरिकांत उपस्थित केला जात आहे. अनाधिकृतरित्या वाळू उपसा रोखण्यासाठी जिल्हाभरात मोहीम राबवलेली आहे. महसूल, पोलिस प्रशासनातील अधिका-यांची पथके देखील नेमलेली आहे. मात्र अवैध वाळू उत्खनन व वाहतूक रोखण्यात संबंधित यंत्रणा अपयशी ठरल्याचे चित्र आहे. वाळू उपसा बंद न झाल्यास रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे.

गिरणा व मोसम नदीपात्रातील वाळू उपसा बंद करण्याचे आदेश असले, तरी देखील चोरट्या पद्धतीने वाळूचा उपसा सुरुच आहे. अनेेेक वेळा संबंधित विभागाकडूून अवैध वाळू उत्खनन व वाहतूूक करणा-यांच्या मुसक्या आवळल्याचा प्रयत्न केला मात्र असफल ठरल्याचे दिसून येते. सध्या वाळूमाफियांची वक्रदृष्टी मोसम नदीपात्रातील वााळूवर पडली असून या ठिकाणाहून मध्यरात्रीच्या सुमारास हजारो ब्रास वाळूचा उपसा सुरु आहे. नागरिकांनी तक्रार करुन देखील कारवाई केली जात नसल्याचे सांगितले जाते. अर्थपूर्ण वरदहस्तामुळेच अवैध वाळू उपसा होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. ट्रॅक्टरच्या होणा-या कर्कश आवाजामुळे शालेय विद्यार्थ्यांना मोठा मनस्थाप सहन करावा लागत आहे. काही दिवसातच बारावी व दहावीच्या परीक्षा असल्याने विद्यार्थी अभ्यासात मग्न आहेत. मात्र कर्कश आवाजामुळे अभ्यासात मन लागत नसल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. तसेच रस्त्यावरील गावातील ग्रामस्थांची झोपही उडाली आहे. वाळू माफियांची अवैध वाळू वाहतुकीचे वाहने बिनदिक्कत कुठेही घेऊन जातात. ज्यांचे जमले नाही, त्यांना मात्र वेठीस धरले जाते. तसेच पोलिस यंत्रणेनेकडे तक्रार केल्यास महसूल विभागाकडे बोट दाखविले जातात आणि महसूल विभागाकडे तक्रार केली की पोलिस संरक्षण नसल्याचे सांगून बोळवण केली जात असल्याचे एका तक्रारदाराने सांगितले. अवैधरित्या वाळू उपसामुळे नदीकाठावरील गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. अनेक गावे नदीकाठी असतानाही टॅकरने तहान भागविली जात असल्याचे निदर्शनास येत आहे. संबंधित विभागाकडून कठोरपणे कार्यवाही करावी अन्यथा आंदोलन छेडले जाईल असा इशारा नागरिकांनी दिला आहे.

...अवैधरित्या वाळू उपसा थांबला नाही तर भविष्यात पुढील पिढीला पाणी मिळणार नाही अशी स्थिती निर्माण झाली. ज्यावेळी आंदोलन छेडले जाते किंवा दैनिकात बातमी येते तात्पुरत्या स्वरूपात वाळू उपसा बंद केला जातो. कायमस्वरूपी अवैध वाळू उपसा बंद होणे अपेक्षित आहे.
- पवन ठाकरे, माजी उपसरपंच खाकुर्डी.

वाळू वाहतूकीचा मोठा फटका विद्यार्थ्यांनाही बसत आहे. ट्रॅक्टरच्या कर्णकर्कश आवाजामुळे मुलांचा अभ्यासही होत नाही आणि झोपही होत नाही. मुलांच्या प्रगतीची वाट लागली आहे.
- पंढरीनाथ आहिरे, पालक

अवैध वाळू उपशास सर्वस्वी प्रशासन जबाबदार असून हितसंबंध जोपासले जात आहे. अवैध वाळू उपसामुळे नद्यामध्ये दगड दिसायला लागलेत. वाळू उपसा रोखण्यास कोणतीही कठोर कारवाई करण्यास प्रशासन धजावत नाही, फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येत नाही. राजकीय नेते अवैध वाळू उपशात सहभागी असून वाळू उपशाची माहिती देनाऱ्यावर दबाव टाकला जातो. अवैध वाळू उपसाविरुद्ध आवाज उठवणाऱ्याला साम दाम दंड भेद नीती वापरून शांत केले जाते. राजरोज सुरू असलेल्या अवैध वाळू उपसा विरुद्ध स्वातंत्र्य तहसीलदार यांच्या नेतृत्वाखाली पोलिस, वन, महसूल विभागाचे संयुक्तपथक नियुक्त करून कारवाई करण्याची व नदीत सॅटेलाईट द्वारे निगराणी राखण्याची गरज आहे.
- निखिल पवार, सामाजिक कार्यकर्ते मालेगाव.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : सत्ता नसतानाही विकास करता येतो

Loksabha Election 2024 : मतदानासाठी परदेशातील पुणेकर शहरात दाखल

Loksabha Election 2024 : बारामतीत वाढलेली लाखभर मते ठरविणार खासदार ; एकूण ५९.५० टक्के मतदान,पुरुषांचा टक्का वाढला, महिलांचा प्रतिसाद कमी

Nashik Police: पोलीस महासंचालकांनी घेतला सुरक्षा यंत्रणेचा आढावा! लोकसभा निवडणुक, पंतप्रधान सभेच्या पार्श्वभूमीवर सूचना

Yerwada Jail News : येरवडा कारागृहात कैद्यांकडून हवालदाराला बेदम मारहाण

SCROLL FOR NEXT