उत्तर महाराष्ट्र

हमाली करत सारंग बनला पोलिस उपनिरीक्षक

सकाळवृत्तसेवा

धुळे - ध्येय निश्‍चित केले, अन त्यात यशस्वी होण्यासाठी आर्थिक, मानसिकसह अन्य कोणत्याही अडचणीवर मात करता येते. आर्थिक स्थितीमुळे केटरिंग, हमाली करत पुढे संगणक विषयात पदविका, स्थापत्य शाखेतील पदवी घेणाऱ्या सारंग ठाकरे यांनी राज्य लोकसेवा आयोगाची उपनिरीक्षकाची परीक्षा उत्तीर्ण केली. 

आदर्श गाव मोराणे (प्र. ल) येथील सारंग ठाकरे हा तरुण पोलिस उपनिरीक्षक परीक्षेत उत्तीर्ण झाला. त्याने आठवीपासून केटरिंग, हमाली कामापासून संगणक परिचालकासह अन्य कामे केली आहेत. त्याचा यशाचा प्रवास ग्रामीण भागातील तरुणांना प्रेरणादायी आहे. सारंगचे वडील प्रदीप पाटील (ठाकरे) शेती काम करतात. आई शोभा ठाकरे सातवीपर्यंत शिकलेली. गावातील अभिजित ठाकरे माध्यमिक विद्यालयात त्याचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण झाले. तो दहावीत बोर्डात दुसऱ्या क्रमाकांने उत्तीर्ण झाला. घरची स्थिती सामान्य असल्याने सारंग व लहान भाऊ पराग (कनिष्ठ अभियंता धुळे महापालिका) यांनी मंगल कार्यालयात केटरिंगचे  काम केले. हे करताना शासकीय तंत्रनिकेतनमध्ये सारंगने संगणक शाखेत प्रथम श्रेणीत यश मिळवले.  लहान भाऊ परागचे शिक्षण शासकीय तंत्रनिकेतनमध्ये झाले. त्यास आर्थिक पाठबळ सारंगने दिले. 

संगणक शाखेत पदविका झाल्यानंतर स्थापत्य शाखेत त्यांनी पदवी घेतली. शिकत असताना सलग दोन वर्ष हमाली, संगणक परिचालकाचे काम केले. त्यानंतर सारंग ठाकरे यांनी पोलिस दलात काम करण्याचा निश्‍चय केला. परीक्षा देऊन पोलिस उपनिरीक्षक पदही मिळवले. अजून उच्च पदासाठी सारंग ठाकरे अभ्यास करणार आहेत. 

भावासाठी काही पण ...  
सारंगचा लहान भाऊ पराग महापालिकेच्या विद्युत विभागात अभियंता आहे. त्याने लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी पाठिंबा दिला. ज्येष्ठ नेते विनायक शिंदे, वडील प्रदीप ठाकरे व आई शोभा ठाकरे, बहीण शीतल ठाकरे, संजय पाटील यासह मोराणे ग्रामस्थांनी सारंगचे कौतुक केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhavesh Gupta:'पेटीएम'च्या अध्यक्षांचा कंपनीला रामराम, तडकाफडकी घेतला करिअर ब्रेकचा निर्णय

'मुझे क्यों तोड़ा'; कंगना रनौतने भर सभेत तेजस्वी सूर्यांवर केली टीका; नेमका काय घोळ झाला?

IPL 2024 LSG vs KKR : ४८ तासांच्या आत कोलकता पुन्हा मैदानात! लखनौ सुपर जायंटस् विरुद्ध आज सामना

Poonch Attack: 30 महिने... सहावा हल्ला अन् 21 जवानांचे बलिदान; भारतीय लष्कर सतत ठरत आहे दहशतवाद्यांचे टार्गेट

Latest Marathi News Live Update : सुनेत्रा पवार यांच्यासाठी अजित पवार यांची सांगता सभा

SCROLL FOR NEXT