sat-bara
sat-bara 
उत्तर महाराष्ट्र

सातबारा संगणकीकरण ठप्प

सकाळवृत्तसेवा

नाशिक - राज्यातील शेतजमिनींचे सातबारा उतारे ऑनलाइन करण्याचे काम सर्व्हर डाऊनमुळे 25 जूनपासून ठप्प झाले आहे. आता राज्यात "डिजिटल इंडिया' मोहिमेंतर्गत राबविल्या जाणाऱ्या प्रकल्पांतील तांत्रिक अडचणी समजून घेण्यासाठी विभागीयस्तरावर कार्यशाळांचे आयोजन करण्यात येईल. सध्या सातबारा उताऱ्यामधील चुकांच्या दुरुस्तीची मोहीम सुरू असून गेल्या एक मे पासून उताऱ्यांचे चावडीवाचन सुरू झाले आहे.

संगणकीकृत आणि हस्तलिखित सातबाऱ्यातील चुकांची दुरुस्ती करून उतारे अद्यायावत करण्यात आले होते. राज्यात 95.48 टक्के काम पूर्ण झालेले असले तरी संगणकीय सात-बाऱ्यावर ऑनलाइन स्वाक्षरीची योजना बारगळण्याची चिन्हे आहे.

25 जूनपासून अडचणीत वाढ
उत्तर महाराष्ट्रात नगर वगळता उर्वरित चारही जिल्ह्यांत सातबारा संगणकीकरणाचे काम रखडले आहे. राज्यात 19 जिल्ह्यांत रि-एडिटच्या कामात तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने या जिल्ह्यांतील तब्बल 1 हजार 985 गावांचे अद्यापही अंतिम प्रमाणपत्र पूर्ण होऊ शकलेले नाही. योजनेतील पहिल्या टप्प्याचे कामही रखडले आहे. तशातच रि-एडिटचे आणि अंतिम प्रमाणपत्र पूर्ण झालेल्या 16 जिल्ह्यांनी संगणकीकृत सात-बारांवर डिजिटल स्वाक्षरीचेही काम हाती घेतल्याने या योजनेच्या कामाचा सर्व्हर 25 जूनपासून डाउन झालेला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'पवित्र ग्रंथ गुरु साहिब'ची पानं गुरुद्वारात घुसून फाडली! जमावाच्या बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू

Nick Jonas: देसी गर्ल प्रियांका चोप्राचा पती निक जोनासची तब्येत बिघडली; व्हिडीओ शेअर करत म्हणाला...

Job Discrimination : मुंबईत नोकरी, पण मराठी माणसालाच नो एन्ट्री? लिंक्डइनवरील पोस्ट होतेय व्हायरल

Samruddhi Accident: समृद्धी महामार्गावरील अपघात कधी थांबणार? कारला मागून धडक दिल्याने तिघांचा मृत्यू

Bhavesh Gupta:'पेटीएम'च्या अध्यक्षांचा कंपनीला रामराम, तडकाफडकी घेतला करिअर ब्रेकचा निर्णय

SCROLL FOR NEXT