Dhule Municipal Corporation esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Municipality News : 7 दिवसात साडेसातशे हरकती दाखल; सुधारित मालमत्ता कर आकारणी प्रक्रिया

सकाळ वृत्तसेवा

Dhule Municipality News : महापालिकेतर्फे शहरातील साक्रीरोड भागातील मालमत्ताधारकांना सुधारित कर आकारणीच्या नोटिसा बजावण्याची कार्यवाही सुरू आहे. याबरोबरच या नोटिसांवर हरकती दाखल करण्याची प्रक्रीया देखील सुरू आहे.

सुधारित कर आकारणी झाल्याने मालमत्ताधारकांना पूर्वीपेक्षा मोठ्या रकमेची बिले जात आहेत.(seven hundred objections filed in 7 days by municipal corporation dhule news)

त्यामुळे तक्रारी होत आहेत. दरम्यान वाढीव कर बिलांमुळे मागील सात दिवसात महापालिकेत ७५० हरकती दाखल झाल्या आहेत. महापालिकेने एका खासगी संस्थेच्या माध्यमातून संपूर्ण महापालिका हद्दीतील मालमत्तांचे नव्याने सर्वेक्षण, मोजमाप केल्यानंतर मालमत्ताधारकांना करयोग्य मूल्यनिश्चिती बाबतच्या नोटिसा वाटप करण्याची प्रक्रिया सुरू झाली.

अर्थात सर्व मालमत्तांना सुधारित कर आकारणी केली जात आहे. प्रारंभी हद्दवाढ क्षेत्रातील अकरा गावात ही प्रक्रिया राबविली गेली. त्यानंतर शहराच्या देवपूर भागासाठी प्रक्रिया पूर्ण झाली. दरम्यान, शहराच्या साक्रीरोड भागात सुधारित कर आकारणीच्या नोटिसा बजावण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.

यात महापालिकेने प्रारंभी कर मुल्यांकनाच्या याद्या प्रसिद्ध केल्या होत्या, त्यानंतर आता वैयक्तिक स्तरावर नोटिसा देण्याची कार्यवाही सुरू आहे. महापालिकेतर्फे आत्तापर्यंत १२ हजार ७४४ नोटिसा वाटप करण्यात आल्या आहेत. अद्याप साधारण दहा हजारावर नोटिसा वाटप करण्याचे बाकी आहे. रोज कर्मचारी नोटिसा वाटप करत असल्याने येत्या काही दिवसात ही प्रक्रिया संपेल. त्यानंतर हरकतींवर कार्यवाही सुरू होईल.

साडेसातशे हरकती दाखल

नोटीस प्राप्त झाल्यापासून २१ दिवसाच्या आत त्यावर हरकत दाखल करण्याची संधी आहे. महापालिकेतर्फे २९ नोव्हेंबरपासून साक्रीरोड भागातील नागरिकांना नोटिसा दिल्या जात आहेत. मागील सात दिवसात महापालिकेकडे एकूण ७५७ हरकती दाखल झाल्या आहेत. मालमत्ता कराबाबत मोठ्या प्रमाणावर तक्रारी असल्याने हरकतींचा हा आकडा वाढत जाणार आहे.

जसे नोटिसा प्राप्त होतील, तशा हरकती दाखल करण्यास देखील वेग येणार आहे. नोटीस प्राप्त झाल्यानंतर तक्रारी घेऊन संबंधित मालमत्ताधारक महापालिकेत अधिकाऱ्यांकडे येत असल्याचे पाहायला मिळत आहे. अधिकाऱ्यांकडून त्यांचे शंका निरसन केले जात आहे. हरकती दाखल करण्यास देखील सांगण्यात येत आहे.

हरकत दाखल करताना संबंधितांनी नेमक्या कारणासह व लेखी पुराव्यासह हरकती दाखल करणे आवश्‍यक आहे. केवळ मोठी करवाढ झाली असे मोघम कारण असले तर त्याला काहीच अर्थ नसल्याचे मनपा अधिकारी सांगत आहे.

साक्रीरोड परिसरातील मालमत्ता नोटिसांची स्थिती

मालमत्ता ३१६८२

बांधकामे २३१४६

नोटिसा वाटप १२७४४ (७ डिसेंबरअखेर)

नोटिसा बाकी १०४०७

दाखल हरकती ७५७ (७ डिसेंबरअखेर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पोलिस भरतीचे वेळापत्रक ठरलं! राज्यात १५,६३१ पोलिसांची भरती; वयोमर्यादा संपलेल्या ‘या’ उमेदवारांना एक संधी; अर्जासाठी ४५० ते ३५० रुपये शुल्क

Donald Trump: ट्रम्प यांच्या शपथविधीपूर्वीचे अपशकुन अन् दुर्याेधनाच्या जन्माची वेळ; भारतावरचं सर्वात मोठं संकट?

Rain-Maharashtra Latest Live News Update: गडचिरोलीत पुरामुळे अडकलेले विद्यार्थी प्रशासनाच्या तत्परतेने परीक्षेसाठी दिल्ली रवाना

CM Devendra Fadnavis : डेटा, एआय व क्वांटम कॉम्प्युटिंगमुळे उत्तम मनुष्यबळ निर्माण होणार

Selu News : पुरात वाहून गेलेल्या एकाचा मृतदेह सापडला; दुसऱ्याचा शोध सुरू

SCROLL FOR NEXT