ninaad-mandavgane
ninaad-mandavgane 
उत्तर महाराष्ट्र

हुतात्मा निनाद मांडवगणे यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार

सकाळवृत्तसेवा

नाशिक -जम्मू-कश्मीरमधील बडगाममध्ये बुधवारी हवाई दलाचे हेलिकॉप्टर कोसळले. त्यात हुतात्मा झालेले नाशिकचे स्क्वॉड्रन लीडर निनाद अनिल मांडवगणे (33) यांच्यावर आज नाशिक येथे लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. लष्कराकडून त्यांना मानवंदनाही यावेळी देण्यात आली.

आज सकाळी त्यांचे पार्थिव त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. यानंतर नाशिकमधील अमरधाम येथे लष्करी इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले..

श्रीनगर विमानतळावरून बुधवारी सकाळी दहा वाजता उड्डाण घेतलेले एमआय-17 व्ही 5 बनावटीचे हवाई दलाचे हेलिकॉप्टर दहा मिनिटांतच कोसळले. या अपघातात पायलटसह सहाजण हुतात्मा झाले. त्यात नाशिकच्या उपनगरजवळील डीजीपीनगर येथील श्री साईस्वप्न को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटीमधील बँक ऑफ इंडिया कॉलनीत राहणारे स्क्वॉड्रन लीडर निनाद अनिल मांडवगणे (33) हे हुतात्मा झाले. 

त्यांच्या पश्चात वडील अनिल, आई सुषमा, पत्नी विजेता, दोन वर्षांची मुलगी असा परिवार आहे. जर्मनीतील त्यांचा धाकटा भाऊ आज नाशिकमध्ये येण्याची शक्यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK vs SRH Live IPL 2024 : सीएसकेची संथ सुरूवात; भुवनेश्वरनं दिला पहिला धक्का

Video : दैव बलवत्तर! छतावरुन कोसळणाऱ्या चिमुकल्याला कसोशीने वाचवलं; व्हिडीओ व्हायरल

Pune Weather Update : बारामतीकरांनी अनुभवला उन्हाळ्यातील सर्वात उष्ण दिवस

Virat Kohli GT vs RCB : मी गेली 15 वर्षे खेळतोय याला काहीतरी... विराट स्ट्राईक रेटवरून बोलणाऱ्यांना दिलं कडक उत्तर

Latest Marathi News Live Update : ...तरीही ममतांनी शेख शाहजहानला संरक्षण देण्याचा प्रयत्न केला- नड्डा

SCROLL FOR NEXT