Shankar-Lahamate
Shankar-Lahamate 
उत्तर महाराष्ट्र

गरिबीवर मात करत शंकरची एमबीबीएसला गवसणी

सकाळवृत्तसेवा

खेड - इगतपुरी तालुक्‍यातील कवडदरा येथील आदिवासी कुटुंबातील शंकर लहामटे याने गरिबीवर मात करत डॉक्‍टर होण्याचे स्वप्न साकार केले आहे. वडील रामदास लहामटे, आई द्रौपदाबाई, लहान भाऊ प्रदीप दौलत असा त्यांचा छोटासा परिवार; परंतु दारिद्य्र जणू त्यांच्या पाचविलाच पुजलेले.

पोटाची खळगी भरण्यासाठी दिवसभर दुसऱ्याच्या शेतात काम करून सायंकाळी माघारी फिरणाऱ्या द्रौपदाबाई घराजवळ येताच रामदास लहामटे दारू पिऊन आलेले असायचे. त्यातून भांडणास सुरवात व्हायची. लेकरांच्या आशेने त्या मारझोड सहन करून मुलांकडे लक्ष द्यायच्या. अशा वेदनांतून व कटकटीतून मुले लहानाची मोठी होत होती. मोठा मुलगा शंकर उघड्या डोळ्यांनी मनातल्या मनात संकटांचा सामना करत होता. सगळी सोंगे करता येतात पण पैशाचे सोंग करता येत नाही. आपण काहीतरी करावे, अशी आशा मनाशी बाळगून शिक्षणाशिवाय पर्याय नाही हे ओळखून त्याने अभ्यास केला व थेट एमबीबीएसपर्यंत मजल मारली. एवढ्यावरच न थांबता एम.डी. मेडिसिन करण्याची इच्छा व्यक्त केली. पहिली ते सातवीपर्यंतचे शिक्षण कवडदरा येथे व त्यानंतर आठवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण पेहरे शेणीत येथे केले. अकरावी व बारावी संगमनेर, तर एमबीबीएससाठी कोल्हापूर येथे जावे लागले. त्याच्या या यशात मामा पंढरी धोंगे, नागेश धोंगे, नामदेव धोंगे, अशोक धोंगे यांचे सहकार्य लाभले. तिसरा लहान भाऊदेखील या वर्षी एमबीबीएसच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत आहे.

मुलांच्या यशामुळे मी आनंदित आहे. मुलाची चिकाटी बघून मला माझ्या वागण्याचा पश्‍चात्ताप होत आहे. यापुढे मी आता दारू पिणार नाही.
- रामदास लहामटे, वडील

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Telangana CM Revanth Reddy : तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना दिल्ली पोलिसांचं समन्स; अमित शाहांच्या व्हिडीओचं प्रकरण

Sairat Complete 8 Years : मराठी सिनेमाला १०० कोटींचं स्वप्न दाखवणाऱ्या 'सैराट'ला ८ वर्षं पूर्ण; रिंकूची पोस्ट चर्चेत

Share Market Closing: शेअर बाजारात तुफान तेजी; सेन्सेक्स 900 अंकांच्या उसळीसह बंद, गुंतवणूकदार मालामाल

Latest Marathi News Live Update: उदयनराजेंच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी कराडमध्ये दाखल

Nashik News : मालेगावी भाजीपाल्याची आवक स्थिर! मे, जून महिन्यात उत्पादन घटण्याचा अंदाज

SCROLL FOR NEXT