nidhi
nidhi 
उत्तर महाराष्ट्र

वाढदिवसाला सत्काराऐवजी संकलित केला 'विद्यार्थी विकास निधी'

भगवान जगदाळे

निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील भाजपचे ज्येष्ठ नेते, संस्थाचालक तथा आदर्श महाविद्यालयाचे अध्यक्ष ऍड. शरदचंद्र जगनाथ शाह यांनी आपल्या 78व्या वाढदिवसाला हितचिंतकांकडून सत्कार स्वीकारण्याऐवजी गरजू व हुशार विद्यार्थ्यांच्या विकासासाठी मदत निधी संकलित करून जमवलेला निधी शाळेकडे सुपूर्द करत समाजात एक 'आदर्श' पायंडा पाडला. तत्पूर्वी त्यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसाला 'विद्यार्थी विकास मंच'साठी त्यांनी 75 हजार रुपये देणगी देत स्वतःपासून कृतीयुक्त सुरुवात केली आहे.

दिवसभरात ऍड. शाह यांनी सुमारे दहा हजार रुपये निधी संकलित केला. आदर्श विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात स्थापन केलेल्या 'विद्यार्थी विकास मंच'चे ते संस्थापक आहेत. समन्वयक शिक्षक शरद जगताप यांच्याकडे त्यांनी रोख दहा हजार रुपये रक्कम सुपूर्द केली. त्यासाठी त्यांनी घरीच 'विद्यार्थी विकास दानपेटी' ठेवली होती. वाढदिवस साजरा करताना हार-तुऱ्यांवर अमाप पैसा खर्च केला जातो. तो खर्च सत्कारणी लागावा म्हणून शुभेच्छा देण्यासाठी येणाऱ्या प्रत्येकाला ते शाल, श्रीफळ ऐवजी विद्यार्थ्यांसाठी मदतनिधी देण्याचे आवाहन करत होते. त्यांच्या या आवाहनाला सर्वांनी उदंड प्रतिसाद दिला.

सकाळपासून सायंकाळपर्यंत शेकडो ग्रामस्थ व कार्यकर्त्यांनी त्यांना प्रत्यक्ष भेटून व दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय व उद्योग क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या या उपक्रमाचे तोंड भरून कौतुक केले. सोशल मीडियावरही त्यांच्या या उपक्रमाचे खूप कौतुक झाले. निजामपूर-जैताणेसह माळमाथा परिसरातील ग्रामस्थांनी याबाबत समाधान व्यक्त केले आहे. संस्थेचे संचालक मंडळ, प्राचार्य, मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले आहे.

अष्टपैलू व बहुआयामी व्यक्तिमत्त्व...
शिक्षणप्रेमी, सामाजिक कार्यकर्ते ऍड. शरदचंद्र शाह यांनी निजामपूरचे माजी सरपंच, पंचायत समितीचे माजी सदस्य, पांझरा-कान सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हाईस-चेअरमन आदी जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. तर सद्या निजामपूर-जैताणे शिक्षण प्रसारक मंडळाचे ज्येष्ठ संचालक तथा वरिष्ठ महाविद्यालयाचे अध्यक्ष आदी जबाबदाऱ्या ते यशस्वीरीत्या सांभाळत आहेत. विद्यमान केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांचा अमृतमहोत्सवी वाढदिवस साजरा झाला होता. तालुक्यासह जिल्ह्याचे दिवंगत नेते रामरावदादा पाटील यांचे खंदे समर्थक म्हणून ते ओळखले जातात. निजामपूर-जैताणेसह माळमाथा परिसर व साक्री तालुक्यासह धुळे जिल्ह्याच्या राजकारणावर त्यांची घट्ट पकड आहे. समाजकारण, राजकारण व शिक्षण ही त्यांची आवडीची क्षेत्रे असून सर्वसामान्य माणूस व गरजू, गोरगरीब विद्यार्थ्यांना ते आपले दैवत मानतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Lok Sabha Ground Report: राम सातपुतेंना धक्का बसणार की प्रणिती शिंदेंना? वंचित गेम चेंजर ठरणार...ग्राऊंड रिपोर्ट वाचा...

जे कुटुंबाला सांभाळू शकत नाहीत ते महाराष्ट्राला काय सांभाळणार?; PM मोदींची पवारांवर कडवट टीका

Gurucharan Singh : गुरुचरण सिंहने रचलाय बेपत्ता असल्याचा कट ? ; पोलिसांनी व्यक्त केला संशय

Suryakumar Yadav: भारताचा 'मिस्टर 360' सूर्यानं 'बेबी एबी'ला शिकवला कसा खेळायचा सुपला शॉट, पाहा Video

Latest Marathi News Live Update : "चित्रा वाघ यांनी माझी माफी मागावी," अनभिनेते राज नयानी यांचा इशारा

SCROLL FOR NEXT