उत्तर महाराष्ट्र

कुटुंबातील तीन सदस्यांची एकाचवेळी आत्महत्या..गाव झाले सुन्न

Suicide News : तापी पुलावर कीटकनाशक, पाण्याची बाटली व चपला आढळल्या. तेथे कावासाकी दुचाकीही उभी होती.

सकाळ डिजिटल टीम

शिरपूर : गिधाडे (ता. शिरपूर) येथील तापी नदीच्या पुलावरून (Tapi river bridge) उडी टाकणाऱ्या महिला व पुरुषांची ओळख पटली असून, तिघेही लोंढरे (ता. शहादा) येथील रहिवासी आहेत. मृतदेहांचा (Death Body) शोध मात्र अद्यापही लागू शकलेला नाही.

(shirpur city tapi river bridge three committed suicide)

गुरुवारी (ता. २२) दुपारी गिधाडे येथील पुलावरून तापी नदीत उडी टाकणारी महिला व दोन पुरुषांना एका युवकाने पाहिले होते. त्याने माहिती दिल्यावरून शिरपूर शहर आणि शिंदखेडा पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी पोचले. पुलावर कीटकनाशक, पाण्याची बाटली व चपला आढळल्या. तेथे कावासाकी दुचाकीही उभी होती. उडी टाकल्याचा भाग शिंदखेडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत असल्यामुळे तेथे आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.

दुचाकीवरून माग
पुलावर आढळलेल्या दुचाकीच्या क्रमांकाची पोलिसांनी मोटारवाहन निरीक्षक कार्यालयात चौकशी केली. त्यात दुचाकी नथा बुधा वाघ (माळी, वय ५६, रा. लोंढरे, ता. शहादा) यांच्या नावावर नोंदविल्याचे आढळले. हा धागा पकडून पोलिसांनी तपास केला असता, नथा वाघ यांची पत्नी सखूबाई (५१) व मुलगा गोपाल (३०) घरातून बेपत्ता असल्याचे दिसून आले. पुलावरून उडी घेणाऱ्यांच्या वर्णनाशी त्यांचे वर्णन जुळल्याने या तिघांनी उडी टाकून आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले. मृत गोपालच्या मागे पत्नी, सहावर्षीय मुलगी व तीनवर्षीय मुलगा असा परिवार आहे.

गावात खळबळ
पांडुरंगशास्त्री आठवलेप्रणीत स्वाध्याय परिवाराचे सदस्य असलेल्या वाघ कुटुंबातील तिघांच्या आत्महत्येने लोंढरे गावात खळबळ उडाली. नदीत उडी टाकण्यापूर्वी त्यांनी कीटकनाशकही प्राशन केल्याचा संशय आहे. स्थिरावलेल्या कुटुंबातील तिघांनी एकाच वेळी आत्महत्या करावी, असे कोणते कारण असावे, याबाबत चर्चा सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC Election: अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीची बीएमसी निवडणुकीत एन्ट्री? दोन्ही मुलींकडून वडिलांसोबत अर्ज दाखल; कोणत्या जागेवरून लढणार?

Marathi Weekly Tarot Horoscope: लक्ष्मी योगामुळे वृषभ, मिथुन, कर्कसह 5 राशींना मिळणार मोठा आर्थिक लाभ; वाचा साप्ताहिक टॅरो राशिभविष्य

Stock Market Holiday : NSE कडून 2026 साठी सुट्ट्यांची यादी जाहीर; 15 दिवस शेअर बाजार बंद! 1 जानेवारीला बाजार सुरू राहणार?

Municipal Election 2025 : युतीच्या बैठकीपासून आमदार मिटकरी वंचित; चर्चेतून डावलल्याने नाराजीचा सूर, पक्षाअंतर्गत गटबाजी समोर...

Latest Marathi News Live Update : पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे कार्यकर्ते नाराज

SCROLL FOR NEXT