Venkatesh Balaji Temple Prati tirupati Balaji Temple esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : शिरपूरला दीड शतकाची परंपरा असलेल्या वहनोत्सवाला आजपासून सुरवात

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : दीड शतकाची परंपरा असलेल्या श्री व्यंकटेश बालाजी संस्थान व प्रतितिरूपती बालाजी संस्थानच्या वहनोत्सवाला रविवार (ता. १५) पासून सुरवात होणार आहे.

२५ ऑक्टोबरला प्रतितिरूपती बालाजी संस्थान, तर २६ ऑक्टोबरला श्री व्यंकटेश बालाजी संस्थानचा रथोत्सव होणार आहे.(Shirpur Vahanotsava started from today dhule news)

दोन बालाजी मंदिरे असलेले शिरपूर खानदेशातील एकमेव शहर आहे. नवरात्रोत्सवात आठवडाभर वहनोत्सव होतो. दसऱ्यानंतर संस्थानांतर्फे रथोत्सव होतो. या वर्षीही दोन्ही संस्थानांतर्फे वहनोत्सव व रथोत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे.

येथील वरचे गावातील व्यंकटेश बालाजी मंदिरात वहनोत्सवाला सुरवात होणार आहे. रविवारी हत्ती, सोमवारी चंद्र, मंगळवारी सूर्य, बुधवारी मोर, गुरुवारी नाग, शुक्रवारी गरुड, शनिवारी मारुती, २२ ऑक्टोबरला वाघ, २३ ऑक्टोबरला सिंह, तर २४ ऑक्टोबरला घोडा या वहनांची मिरवणूक निघणार आहे.

२६ ऑक्टोबरला बालाजी महाराजांचा रथोत्सव होईल. मठाधिपती मेघश्याम महाराज बुवा यांच्या हस्ते रथपूजा होईल. आमदार अमरिशभाई पटेल अध्यक्षस्थानी असतील.

आमदार काशीराम पावरा, न्या. पंकज जोशी, आर. आर. भद्रे, मयूर राणे, उपविभागीय अधिकारी प्रमोद भामरे, तहसीलदार महेंद्र माळी, डीवायएसपी सचिन हिरे, अध्यक्ष भूपेशभाई पटेल, भाजपचे जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ. तुषार रंधे, पोलिस निरीक्षक अन्साराम आगरकर, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष देवेंद्र पाटील उपस्थित राहतील.

संस्थानचे अध्यक्ष शरदकुमार अग्रवाल, कार्याध्यक्ष झेंडूसिंह पाटील, उपाध्यक्ष दिलीप लोहार, उत्तमराव माळी, कोशाध्यक्ष भूपेश अग्रवाल, सहकोशाध्यक्ष किरण दलाल, चिटणीस श्यामकांत ईशी आदी संयोजन करीत आहे.

खालचे गावातील प्रतितिरूपती बालाजी संस्थानचा वहनोत्सवही रविवारपासून सुरू होणार आहे. वहनोत्सवादरम्यान रोज सायंकाळी सप्तावरण पूजा होईल. २५ ऑक्टोबरला संस्थानतर्फे रथोत्सव होणार आहे. न्या. रमेश भद्रे व तहसीलदार महेंद्र माळी यांच्या हस्ते रथपूजा होईल. आमदार अमरिशभाई पटेल अध्यक्षस्थानी असतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Registrar Dairy Department Transferred : रात्रीतून सुत्रे फिरली गोकुळच्या राजकारणाला नवे वळण, थेट दुग्ध विभागाच्या निबंधकांची उचलबांगडी; सभासद नोंदणी वाद भोवला

Vidhan Parishad Election: विधान परिषदेसाठी भाजपमध्ये 'ही' नावे चर्चेत, आमदारकीसाठी 'फिल्डिंग' लावायला सुरुवात, कुणाला मिळणार संधी?

India Petrochemical Duty Exemption : सरकारचा मोठा निर्णय ! ४० प्रमुख पेट्रोकेमिकल्सवरील आयात शुल्कात सूट,'या' उद्योगांना दिलासा

Latest Marathi News Live Update : रांजणगावमध्ये तरुणावर लाकडी बॅटने हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Vidarbha News: भरधाव दुचाकीच्या अपघातात तरुण जागीच ठार; जाम महामार्गावर नियंत्रण सुटल्यामुळे दुचाकीने वाहनाला धडक

SCROLL FOR NEXT