While meeting Chief Minister Eknath Shinde and honoring him, group leader of Dhanur Sunil Shinde, Dr. Chaudhary, Praveen Patil etc. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule : धनूर येथे अश्वारूढ पुतळा बसणार?

सकाळ वृत्तसेवा

कापडणे (जि. धुळे) : धनूर (ता. धुळे) येथील ग्रामपंचायतीचे पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांची भेट घेतली. धनूर येथील शिवस्मारकला लवकरात लवकर मान्यता मिळावी. यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी चर्चा झाली.

मुख्यमंत्री शिंदे यांचे स्वीय्य सहाय्यक राजेश सोनवणे यांनी सविस्तर माहिती जाणून घेतले.
धनूर येथील छत्रपती शिवाजी महाराजांचे ‘शिवस्मारक’ हा विषय माजी मंत्री बच्चू कडू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुपरिचित असल्याने त्यांनी प्रशासकीय मान्यतेसाठी आवश्यक ते सहकार्य करण्याची सकारात्मकता दर्शविली. (sivsamarak statue will placed at Dhanur or not dhule Latest Marathi news)

धनूरचे गटनेते सुनील शिंदे, डॉ. मधुकर चौधरी, उपसरपंच प्रवीण पाटील, भाजपचे ओबीसी सेलचे धुळे ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष आर. के. माळी यांनी शिवस्मारकला मंजुरी मिळाल्यास मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे उद्‌घाटन करण्यात येईल असे नमूद केले. त्यास मुख्यमंत्री शिंदे यांनी स्मितहास्य करत दुजोरा दिला.

दरम्यान स्मारकाच्या परवानगीस वेग येणार असल्याने ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्या भेटीसाठी गटनेते शिंदे, उपसरपंच प्रवीण पाटील, डॉ. मधुकर चौधरी, बाळासाहेब शिंदे, वैभव चौधरी, आर. के. माळी, श्याम माळी, सुरेश जाधव आदी उपस्थित होते.

देण्यात आल्या नोटिसा

धनूर येथे एकोणीस फेब्रुवारी अर्थात शिवजयंतीला पहाटे अज्ञात ग्रामस्थांनी विना परवानगी अश्वारुढ पुतळा बसविला होता. २१ फेब्रुवारीला जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दोन दिवसात पुतळा हटविण्याचा अल्टिमेटम दिला होता. त्यानंतर अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्थेत आणि संचारबंदी लागू करून २७ फेब्रुवारीला पहाटे पुतळा काढण्यात आला होता. त्यावेळी धनूरमध्ये सात दिवस संचारबंदी होती. मोठा तणावही निर्माण झाला होता. सरपंच व ग्रामसेवक यांच्यावर अपात्रतेच्या नोटीसही बजावण्यात आल्या होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed Railway: बीडकरांची ४० वर्षांची स्वप्नपूर्ती! उद्यापासून अहिल्यानगर ते बीड 'रेल्वे'सेवेला सुरुवात; काय आहेत वैशिष्ट्ये?

Yermala News : धाराशिव जिल्ह्यातील कला केंद्रांच्या गैरप्रकारांवर कारवाईसह परवाने रद्द करण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश

‘एसटी’ आरक्षणासाठी बंजारा समाजाचा सोलापुरात मोर्चा! पारंपरिक वेशभूषेत तरुणांसह महिलांची मोठी गर्दी; आरक्षण मिळेपर्यंत न थांबण्याचा बंजारा समाजाचा निर्णय

Maratha Reservation: १९९४ चा जीआर नेमका काय आहे? मराठा समाज आरक्षणाबाहेर राहिला, कारण...

Latest Marathi News Updates: भाजपमध्ये घराणेशाही नाही- देवेंद्र फडणवीस

SCROLL FOR NEXT