Crime
Crime 
उत्तर महाराष्ट्र

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्टमुळे एकाविरुद्ध गुन्हा

सकाळवृत्तसेवा

धुळे - सोशल मीडियावर आक्षेपार्ह व महिलांबाबत अश्‍लील बोलून धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी संशयित मुन्ना धिवरे याच्याविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला.

यासंदर्भात शिवसेना जिल्हाप्रमुख हिलाल माळी यांच्यासह कार्यकर्त्यांनी अप्पर पोलिस अधीक्षक विवेक पानसरे यांना निवेदन दिले. निवेदनानुसार सोशल मीडियाच्या फेसबुक व व्हाटसॲपवर मुन्ना धिवरे (पूर्ण नाव समजू शकले नाही) याने देवदेवता व राष्ट्रपुरुषांबद्दल आक्षेपार्ह मजकूर टाकला. त्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे केली. यावेळी पंकज गोरे, नितीन पाटील, देवराम माळी, विकास शिंगाडे, राजेश पटवारी, संदीप सूर्यवंशी, मुकेश चित्ते, स्वप्नील सोनवणे, संदीप मुळीक, शत्रुघ्न तावडे आदी उपस्थित होते. दरम्यान, विकास सुधाकर गोमसाळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी संशयित मुन्ना धिवरे याच्याविरुद्ध शहर पोलिसांत गुन्हा दाखल झाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Suchrita Mohanti: काँग्रेसच्या उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट; कारण ऐकून म्हणाल...

Indian Constitution : '...तर मोदी सरकारने केव्हाच देशाचे संविधान बदलले असते'

Pratik Gandhi : प्रतीक साकारतोय गांधी ; हॅरी पॉटर फेम 'या' अभिनेत्याची सिनेमात वर्णी

Reels Addiction : इन्स्टाग्राम अन् यूट्यूबचं कशामुळे लागतंय व्यसन? जाणून घ्या कसं काम करतं अल्गोरिदम..

Rishabh Pant: "ऋषभ पंतसोबत लग्न कर, तो तुला खुश ठेवेल..."; नेटकऱ्याची कमेंट, उर्वशीनं अवघ्या दोन शब्दात दिलं उत्तर

SCROLL FOR NEXT