Vijeta-Mandavgane
Vijeta-Mandavgane 
उत्तर महाराष्ट्र

सैनिकाची पत्नी होणे गर्वाची गोष्ट - विजेता मांडवगणे

सकाळवृत्तसेवा

नाशिक - भारतीय सैन्यदलात अधिकाऱ्यांची वानवा आहे. तेथील प्रवेशासाठी केवळ राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी हाच एक मार्ग नाही, तर अन्य अनेक मार्ग आहेत. निनाद मांडवगणे काश्‍मिरात शहीद झाल्यावर केवळ देशातूनच नव्हे, तर परदेशातून सहानुभूती व पाठिंबा व्यक्त करण्यात आला. सैन्यदलाच्या बलिदानावरच देश उभा असून, अशा सैनिकाची पत्नी बनणे यासारखी दुसरी गर्वाची गोष्ट नाही, असे प्रतिपादन शहीद निनाद मांडवगणे यांची पत्नी विजेता मांडवगणे यांनी बुधवारी (ता. १) केले.

वसंत व्याख्यानमालेने यंदा ९८ व्या वर्षात पदार्पण केले आहे. बुधवारपासून गंगाघाटावरील देवमामलेदार पटांगणावर सुरू झालेला हा ज्ञानयज्ञ पुढील महिनाभर सुरू राहणार आहे. शहीद जवान निनाद मांडवगणे यांच्या कुटुंबीयांच्या प्रकट मुलाखतीने मालेचा प्रारंभ झाला. अपर्णा क्षेमकल्याणी यांनी मांडवगणे कुटुंबीयांना बोलते केले. मुलाखतीत स्वर्गीय निनादच्या पत्नीसह वडील अनिल व आई सुषमा मांडवगणे अशा तिघांनी निनादचे बालपण ते शहीद होण्यापर्यंतचा प्रवास कथन करताना त्यांच्या जीवनातील विविध पैलू उलगडले. 

जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी मालेचे उद्‌घाटन केले. व्यासपीठावर मांडवगणे कुटुंबीयांसह बॅंक ऑफ महाराष्ट्रचे विभागीय व्यवस्थापक बी. एस. टाव्हरे, कार्याध्यक्ष चंद्रशेखर शाह, सचिव संगीता बर्वे, मुक्तेश्‍वर मुनशेट्टीवार, मधुकर झेंडे, मंडालेश्‍वर काळे, शंकरराव बर्वे यांच्यासह मालेच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य उपस्थित होते. मालेचे अध्यक्ष श्रीकांत बेणी यांनी प्रास्ताविक केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salman Khan: सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरण! एका आरोपीचा पोलीस कोठडीत आत्महत्येचा प्रयत्न, प्रकृती गंभीर

Monsoon Season : यंदा 'मॉन्सून' लवकरच हजेरी लावणार; हवामानतज्ज्ञांचा अंदाज, उष्णतेमुळे पाण्याचे बाष्पीभवन वेगाने

Changpeng Zhao: बिनन्सच्या संस्थापकाला तुरुंगवास; जगातील सर्वात श्रीमंत क्रिप्टो एक्सचेंजमध्ये नेमकं काय झालं?

नाशिकचा सस्पेन्स संपला ! हेमंत गोडसे यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर, शांतिगिरी महाराजांना धक्का

Latest Marathi News Live Update: छत्तीसगडमध्ये अँटी-नक्षल ऑपरेशन सुरू; १० नक्षलवाद्यांचे मृतदेह ताब्यात

SCROLL FOR NEXT