A team including Srikant Dhiware, Dattatray Shinde present during the inspection of the bikes seized by LCB. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime News : 9 दुचाकी हस्तगत; एलसीबीची कारवाई

सकाळ वृत्तसेवा

Dhule Crime News : एलसीबीच्या पथकाने शहरात गुरुवारी (ता. ३०) दोन विधिसंघर्षित बालकांसह तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून साडेतीन लाखांच्या चोरीच्या नऊ दुचाकी जप्त केल्या. तपासात या संशयितांनी घरफोडीचा गुन्हाही कबूल केला. त्यांच्याकडून घरफोडीतील ऐवजही जप्त केला.(stolen two wheelers were seized by LCB dhule crime news)

गुरुद्वाराच्या पुलाखाली तिघे चोरटे उभे असल्याची माहिती एलसीबीचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला पाचारण केले असता फैजान मुजम्मील अन्सारी (रा. कबीरगंज, हाजीनगर, वडजाई रोड, धुळे) व अन्य दोन विधिसंघर्षित बालकांना ताब्यात घेण्यात आले.

त्यांच्याकडे पश्चिम देवपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून चोरलेली दुचाकी आढळली. पोलिसांनी तिघांना हिसका दाखविताच त्यांनी सरदार हॉल शेजारच्या काटेरी झुडपात ठेवलेल्या दोन दुचाकी काढून दिल्या. तसेच त्यांच्या घराजवळून पाच दुचाकी हस्तगत झाल्या. यात चार स्प्लेंडर, हीरो आणि होंडा कंपनीच्या एकेक दुचाकीचा समावेश आहे.

हस्तगत केलेली दोन वाहने वगळता अन्य दुचाकी चोरीचे गुन्हे देवपूर, अमळनेर, पारोळा, सुरत, मारवाड, मालेगाव आदी ठिकाणी दाखल आहेत. त्यामुळे एलसीबीने सात दुचाकींचे गुन्हे उघडकीस आणले. तिघांनी चाळीसगाव रोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत संत नरहरी कॉलनी (अंबिकानगर) येथील बंद घरातून चोरी केल्याचे तपासात निष्पन्न झाले.

त्यांच्याकडून चोरलेली सहा हजारांची चांदीची पट्टी आणि पाच हजारांची रोकड मिळाली. या कारवाईत तीन लाख ४१ हजारांच्या नऊ दुचाकी तसेच घरफोडीचा ऐवज हस्तगत केला. तथापि, फैजान अन्सारी हा हिस्ट्रिशीटर असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याच्यासोबतच्या एका विधिसंघर्षित बालकावरही विविध पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत.

पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे, अमरजित मोरे, बाळासाहेब सूर्यवंशी, प्रकाश पाटील, श्याम निकम, संजय पाटील, मच्छिंद्र पाटील, संतोष हिरे, सुरेश भालेराव, रविकिरण राठोड, सुशील शेंडे, नीलेश पोतदार, गुणवंत पाटील, योगेश साळवे, हर्शल चौधरी यांनी ही कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Viral Video: पहिली रेल्वे 172 वर्षापूर्वी मुंबईत धावली, पहिल्या यात्रेकरुचा AI व्हिडिओ व्हायरल, 1853 मधील क्षण पाहा...

"सिंगल पालक म्हणून अधिक जबाबदारी" थोडं तुझं फेम अभिनेत्रीने आई म्हणून उलगडला प्रवास ; "मला अभिमान.."

Pune: पुण्यात नामांकित संस्थेच्या कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांमध्ये राडा, कोयते आणि हातोड्याने हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Satara News: 'कऱ्हाड आगाराला आणखी पाच नवीन बस'; एसटी कर्मचाऱ्यांच्या हस्ते लोकार्पण; लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्याला यश

Best Airlines: फॅमिली ट्रिपसाठी फ्लाइट बुक करताय? मग आधी बघा कोणती एअरलाइन्स देते सर्वाधिक सुरक्षितता आणि आराम!

SCROLL FOR NEXT