उत्तर महाराष्ट्र

चिमुकल्या रेणूची कथा लघुपटातून झळकणार

विजयसिंग गिरासे

चिमठाणे (जि. धुळे) - बाप पळून गेल्याने घरात कमावते कुणी नाही. एकट्या आईच्या रोजंदारीवर काय भागणार, म्हणून ज्या वयात शिक्षणाची कास धरावी त्या वयात मजुरीला जाण्यासाठी वर्गशिक्षिकेला पत्र लिहून सुटी मागणाऱ्या व समाजमन सुन्न करून सोडणाऱ्या ‘रेणू महादू भिल’ची कहाणी गेल्या वर्षी ‘सकाळ’ने प्रसिद्ध केली. आता याच ‘रेणू’च्या जीवनावर आधारित तिच्याच नावाने लघुपट तयार झाला असून, त्याचे येत्या सोमवारी (ता. २६) दिल्लीत राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेत सादरीकरण होत आहे.

सोंडले (ता. शिंदखेडा, जि. धुळे) येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत गेल्या वर्षी तिसरीत शिकणाऱ्या या रेणूवर घरच्या विचित्र परिस्थितीमुळे शाळेत न जाता आईबरोबर मजुरी करण्याची वेळ आली होती. याबाबत तिने वर्गशिक्षिका पद्मजा पाटील यांना प्रामाणिकपणे मोडक्‍या-तोडक्‍या मराठी भाषेत का होईना चिठ्ठी लिहीत आपण शाळेला का येऊ शकत नाही, हे कळविले होते. तिच्या पत्रातील मजकूर समाजधुरिणांपुढे अनेक प्रश्‍न उपस्थित करणारा ठरला होता. याबाबत ‘सकाळ’ने वृत्त देताच ‘रेणू’ला शिंदखेडा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी मनीष पवार यांनी दत्तक घेतले. समाजातील अनेक दानशूरांनी तिच्या शिक्षणासाठी आर्थिक मदतही दिली. यात केंद्रीय मंत्री रामदास आठवले, राज्याचे रोहयो व पर्यटनमंत्री जयकुमार रावल; तसेच विविध संस्थांचा समावेश होता. या रेणूच्या जीवनावर आधारित आता लघुपट तयार झाला आहे.

महाराष्ट्रातून तीन लघुपट
भारतातून सर्व राज्यांतून ठराविक विविध १६ लघुपटांची निर्मिती झाली असून, त्यांचे दिल्लीत सादरीकरण होणार आहे. त्यात महाराष्ट्रातून तीन लघुपटांची निवड झाली. त्यांचे सादरीकरण २६ ते २८ नोव्हेंबरदरम्यान होणार आहे. त्यात ‘रेणू’ या लघुपटाचाही समावेश आहे, असे या लघुपटाचे निर्माता-दिग्दर्शक संतोष केंद्रे (नांदेड) यांनी ‘सकाळ’ला सांगितले.

रेणू लघुपट प्रेरणादायी
रेणूची माहिती जगासमोर यावी, अशा समाजातील अनेक रेणू शिक्षणापासून वंचित राहू नयेत, यासाठी एक प्रेरणादायी लघुपट तयार केला आहे. त्याची पटकथा साताऱ्याचे प्राथमिक शिक्षक विक्रांत गुंड यांनी लिहिली आहे. लघुपटात एकूण १७ कलाकारांचा सहभाग आहे. रेणूच्या भूमिकेत शिवतरा तिडकेने अभिनय केला आहे. लघुपटाचे निर्माता व दिग्दर्शक संतोष व्यंकटराव केंद्रे आहेत.

शिंदखेडा येथे वर्षभरापूर्वी नोकरीला असताना ‘रेणू’विषयीची माहिती ‘सकाळ’मध्ये वाचली होती. त्यानंतर यावर आधारित पटकथा तयार केली. हृदयस्पर्शी लघुपटाद्वारे दिल्लीत सादरीकरण होणार असल्याने आनंद होत आहे. 
- विक्रांत गुंड, पटकथा लेखक, सातारा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT