police
police esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar News : बेपत्ता 1 हजार 207 महिलांना शोधण्यात यश; जिल्हा पोलिस दलाची कामगिरी

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar News : जिल्ह्यातील बेपत्ता झालेल्या एक हजार २०७ महिला २६३ अल्पवयीन मुलींना शोधण्यात नंदुरबार जिल्हा पोलिस दलाला यश आले आहे.

जिल्हा पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील व अपर पोलिस अधीक्षक नीलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार पोलिसांनी कौतुकास्पद कामगिरी केली आहे. (Success in finding 1 thousand 207 missing women nandurbar news)

जिल्हा पोलिस गुन्हे बैठकीत जिल्ह्यातील मालमत्तेविरुद्धचे घरफोडी, चोरी इत्यादी गुन्ह्यांचा आढावा दरमहा घेण्यात येतो. नंदुरबार जिल्ह्यातील विविध पोलिस ठाणे हद्दीत २०१८ ते २०२२ या पाच वर्षांच्या कालावधीत एक हजार २७८ महिला बेपत्ता व २७४ अल्पवयीन मुलींचे अपहरण करून पळवून घेऊन गेल्याचे गुन्हे दाखल होते.

त्यांपैकी काही बेपत्ता झालेल्या महिला व अपहरणाच्या गुन्ह्यातील पीडित मुली अद्यापही मिळून आलेल्या नाहीत. त्याअनुषंगाने अशा गुन्ह्यांचा गांभीर्याने तपास करून बेपत्ता झालेल्या महिला, अपहरण करून पळवून घेऊन गेलेल्या अल्पवयीन

मुलींचा शोध घेण्याबाबत विशेष मोहीम राबवून जास्तीत जास्त बेपत्ता महिला व अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलींचा शोध घेण्याबाबत पोलिस अधीक्षक पाटील यांनी बैठकीत सर्व पोलिस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांना निर्देश दिले.

पोलिस महासंचालक, महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्याकडील आदेशान्वये १ जून २०२१ पासून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात पोलिस नियंत्रण कक्षात मिसिंग डेस्क तयार करण्यात आला आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

नंदुरबार जिल्हा पोलिस नियंत्रण कक्षात मिसिंग डेस्क स्थापन करण्यात आला असून, नियंत्रण कक्षामार्फत पोलिस ठाण्यात संपर्क करून पोलिस ठाणे स्तरावर दाखल बेपत्ता बालके, महिला व पुरुष यांचे नातेवाईक तसेच प्रभारी अधिकारी व बेपत्ता प्रकरणातील तपासी अधिकारी यांना दररोज संपर्क करून बेपत्ता व्यक्तींबाबत माहिती घेऊन ते मिळून येण्याकरीता प्रयत्न केले जातात.

या अनुषंगाने नंदुरबार जिल्ह्यातील प्रत्येक पोलिस ठाण्यामधील एक पोलिस अधिकारी व दोन पोलिस अंमलदार असे एकूण १२ पोलिस अधिकारी व २४ पोलिस अंमलदारांचे पथक पोलिस ठाणे स्तरावर तयार करण्यात आलेले होते. स्थापन करण्यात आलेल्या पथकातील पोलिस अधिकारी व

पोलिस अंमलदार यांनी २०१८ ते २०२२ या पाच वर्षांच्या कालावधीत महाराष्ट्रासह गुजरात व मध्य प्रदेश राज्यात जाऊन बेपत्ता झालेल्या एक हजार २७८ महिलांपैकी एक हजार २०७ व २७४ अल्पवयीन मुलींपैकी २६३ अल्पवयीन मुलींना शोधण्यात नंदुरबार जिल्हा पोलिस दलास यश आले आहे.

अपहरणाच्या गुन्ह्यांतील शोध न लागलेल्या मुलींचा शोध घेण्याकरिता नंदुरबार जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधीक्षक कार्यालयात अनैतिक मानवी वाहतूक व्यापार कक्ष (AHTU) स्थापन करण्यात आला असून, या कक्षाकडून अल्पवयीन मुलींचा शोध घेण्यात येतो.

मागील दोन वर्षांत २०१७ पासून शोध न लागलेल्या १४ अल्पवयीन मुलींचा शोध घेण्यात अनैतिक मानवी वाहतूक कक्षाला यश आले आहे. अपहरणाच्या दाखल गुन्ह्यात तपासादरम्यान असे निदर्शनास आले आहे, की यातील १३ ते १८ वर्षे वयोगटाच्या बऱ्याच अल्पवयीन मुलींना फूस लावून ओळखीच्या व्यक्तीबरोबर घरातून निघून गेल्याचे समजून आले आहे.

या मुलींचा देहव्यापार, शरीरविक्रय, अमली पदार्थ किंवा गुन्हेगारांच्या टोळीत सहभागी होऊ नये यासाठी अनैतिक मानवी वाहतूक व्यापार कक्षाकडून संबंधित मुलींचा लवकरात लवकर शोध घेऊन त्यांना त्यांच्या पालकांच्या ताब्यात देण्यात येते.

"नंदुरबार जिल्ह्यात अल्पवयीन मुलींचे अपहरण व बेपत्ता झालेल्या महिलांचा शोध घेण्यासाठी संपूर्ण पोलिस यंत्रणा सतर्क करण्यात आली आहे. अल्पवयीन मुलींचे व महिलांचे तस्करी होऊ नये व त्या लवकरात लवकर त्यांचा शोध लागावा यासाठी पोलिस अधीक्षक कार्यालयात विशेषकक्षाची स्थापना करण्यात आली आहे.

बेपत्ता महिला व अल्पवयीन मुलींचा शोध घेण्यासाठी नंदुरबार जिल्हा पोलिस नेहमी प्रथम प्राधान्य देऊन काम करीत आहेत. गुन्हे तपासाबरोबरच अल्पवयीन मुली, महिला यांचा शोध घेण्याकरिता सचोटीने प्रयत्न करण्याबाबत पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी सर्व पोलिस ठाणे प्रभारी अधिकारी यांना निर्देश देण्यात आले आहेत." -पी. आर. पाटील, जिल्हा पोलिस अधीक्षक, नंदुरबार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: सेंड ऑफ देणाऱ्या KKRच्या खेळाडूलाच BCCI ने दिला सेंड ऑफ; दंडाचीच नाही, तर बंदीचीही झाली कारवाई

Aditya Thackeray : बाहेरचे लोक कोण आम्हाला येऊन सांगणारे? आदित्य ठाकरेंची भाजपवर टीका

LSG vs MI IPL 2024 Live : लखनौ सुपर जायंट्सने नाणेफेक जिंकली; मुंबईसाठी करो या मरो सामना

तुम्हाला पत्रावळीवर जेवायची इच्छा झाली आणि तुम्ही वाटोळे करून घेतलं; जितेंद्र आव्हाड यांची मुख्यमंत्री शिंदेंवर टीका

Ulhasnagar News : उल्हासनगरातील बेवारस वाहने पालिकेच्या रडारवर; 11 वाहन मालकांकडून 17 हजाराचा दंड वसूल

SCROLL FOR NEXT