Sankalp Bhamre seen in New York Times Square. esakal
उत्तर महाराष्ट्र

Success Story : संकल्प भामरे झळकला अमेरिकेतील New York Times Squareमध्ये

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : कापडणे ही स्वातंत्र्यसैनिकांची भूमी आहे. प्राच्यविद्या पंडित कॉम्रेड शरद पाटलांची जन्मभूमी आहे. साहित्यिक माजी आमदार सदाशिव माळी आणि अनंतराव पाटलांची प्रेरणाभूमी आहे. ही विद्वानांची भूमी आहे.

सैनिकांची भूमी आहे. विविध क्षेत्रात प्रगती करणाऱ्यांची कमी नाही. येथील मूळ रहिवासी व पुणेस्थित संकल्प भामरेचा फोटो अमेरिकेतील न्यू यॉर्क टाइम्स स्क्वेअरमध्ये झळकला आहे. विद्यार्थिदशेतच संकल्पचा डंका सातासमुद्रापार गेला आहे. कापडणेसह खानदेशाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.(Success Story Sankalp Bhamare appeared in New York Times Square in America Bhamre from Powai IIT Dhule News)

संकल्प भामरे कापडण्याचे मूळ रहिवासी. पवई आयआयटीच्या तिसऱ्या वर्षाला आहे. तिसऱ्या वर्षाला असतानाच मॉर्गन स्टनली (Morgan Stanley) या बहुराष्ट्रीय कंपनीत इंटर्नशिपसाठी निवड झाली आहे.

विशेष कौशल्य असणाऱ्या अभियंत्यांचे स्वागत म्हणून संकल्पचा फोटो टाइम्स स्क्वेअरला झळकला आहे. टाइम्स स्क्वेवरला झळकणे हा एक मोठा बहुमान समजला जातो. तोही विद्यार्थिदशेतच झळकल्याने खानदेशवासीयांची मान उंचावली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

पवई आयआयटीतील अँकक्टिव विद्यार्थी

संकल्प भामरे हा पवई (मुंबई) येथील नामांकित आयआयटीत इलेक्ट्रिक शाखेत बी. टेक. करीत आहे. तिथेही विविध संशोधनात तो मजल मारीत आहे. विद्यार्थी संशोधक म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे.

अँकक्टिव स्टुडंट म्हणून त्याने ख्याती मिळविली आहे. दरम्यान, येथील निवृत्त मुख्याध्यापक (कै.) रघुनाथ श्रीराम पाटील व निवृत्त मुख्याध्यापिका भिकूबाई पाटील यांचा नातू आहे. पुणे येथील टीसीएस या बहुराष्ट्रीय माहिती तंत्रज्ञान कंपनीत उच्च पदावर कार्यरत प्रवीण भामरे (Global Delivery Head, TCS, Pune ) यांचा मुलगा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT