Alco test of bus drivers for safety of passengers  esakal
उत्तर महाराष्ट्र

MSRTC Alco Test: दोषी चालकांवर निलंबनाची कारवाई; धुळे विभागात 9 जण आढळले

सकाळ वृत्तसेवा

MSRTC Alco Test : एसटी महामंडळाच्या चालकांची ३१ ऑगस्ट व १ सप्टेंबरला ‘अल्को टेस्ट’ मशिनद्वारे तपासणी मोहीम राबविण्यात आली. यात चालकांच्या तपासणीत धुळे विभागातील नऊ चालक मद्यप्राशन करून कामावर आढळले.

सर्व मद्यपी चालकांवर गुन्हे दाखल करून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई होणार असल्याचे एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी म्हटले आहे. (Suspension action against guilty drivers 9 people found in Dhule Division in alco test msrtc)

एसटी चालकांनी मद्यप्राशन करून कामावर राहणे हा गंभीर गुन्हा आहे. त्यामुळे त्यांच्या हातून अपघात घडण्याची दाट शक्यता असते. काही एसटी बसचालक मद्यपान करून वाहन चालवीत असल्याच्या तक्रारी झाल्या.

विशेषत: ज्या बस रात्री मुक्कामी जातात अशांच्या बसचालकांबाबत या तक्रारी जास्त होत्या. त्याची गंभीर दखल घेत एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक चन्ने यांनी महामंडळाचे वाहतूक विभागाचे महाव्यवस्थापक शिवाजी जगताप यांना ३१ ऑगस्ट व १ सप्टेंबर, असे दोन दिवस एकाच वेळी चालकांची ‘अल्को टेस्ट’ मशिनद्वारे तपासणी करण्याची सूचना दिली.

त्यानुसार राज्यात एकाच वेळी राबविण्यात आलेल्या मोहिमेत धुळे विभागात नऊ चालक ड्यूटीवर असताना मद्यप्राशन केलेले आढळले. दोषी कर्मचाऱ्यांना कामावर येण्यास मनाई केली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

मद्यधुंद बसचालकावर गुन्हा

दोंडाईचा (ता. शिंदखेडा) येथील बस स्थानकात शुक्रवारी (ता. १) सकाळी छत्रपती संभाजीनगर आगारातील बसचालक मद्यधुंद अवस्थेत आढळला. विनोद विठ्ठलराव पोपटे (रा. मुकुंदवाडी, सिडको, छत्रपती संभाजीनगर) असे त्याचे नाव आहे.

त्याच्याविरुद्ध दोंडाईचा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. बस पहाटे अक्कलकुवा येथून छत्रपती संभाजीनगरकडे जाण्यास निघाली असता राज्य परिवहन महामंडळातर्फे चालकांच्या मद्यपानबाबातच्या तपासणीत बसचालक पोपटे मद्यधुंद आढळले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: शुभमन गिलने जिंकलं 'दिल'! ऐतिहासिक कामगिरी अन् इंग्लंडला न पेलवणारे लक्ष्य; भारताच्या १०००+ धावा

Central Railway: मध्य रेल्वेची ज्येष्ठांसाठी मोठी घोषणा

लग्न न करताच ४० व्या वर्षी जुळ्या मुलांची आई होणार अभिनेत्री; म्हणाली, 'आपल्याकडे एकटी स्त्री...

Aurangabad Murder Case : काकाच्या प्रेमात पडलेल्या महिलेने ४० लाख अन् प्लॉट हडपण्यासाठी काढला पतीचा काटा!

IND vs ENG 2nd Test: इंग्लंडच्या खेळाडूने रिषभ पंतला दाखवलं 'आमिष'; आपल्या पठ्ठ्याने काय उत्तर दिले पाहा, Viral Video

SCROLL FOR NEXT