Market Committee Election
Market Committee Election esakal
उत्तर महाराष्ट्र

Taloda Market Committee Election : शहाद्यात फॉर्मुल्यांवरील चर्चा थांबता थांबेना; संभ्रम वाढला

फुंदीलाल माळी

तळोदा : उमेदवारी अर्ज भरण्याच्या मुदतीला एकच दिवस शिल्लक असताना येथील कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी शुक्रवारी (ता. ३१) पर्यंत केवळ १४ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. तालुक्यात अनेक फॉर्मुल्यांवर चर्चा होताना दिसून येत आहेत. (Taloda Market Committee Election Only 14 nominations were filed till 31 march nandurbar news)

मात्र माजी आमदार उदेसिंग पाडवी व विद्यमान आमदार राजेश पाडवी या दोन्ही मातब्बर नेत्यांच्या भूमिकेवर बाजार समिती बिनविरोध होणार अथवा नाही यावर सगळे अवलंबून असून फॉर्मुल्यांवरील चर्चा थांबता थांबेना असेच चित्र असल्याचे दिसत आहे.

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी तालुक्याचे राजकीय वातावरण गरम झाले आहे. संचालक मंडळाच्या १८ जागांसाठी तब्बल ११४ उमेदवारी अर्ज विक्री झाले आहेत. त्यामुळे सोमवारी (ता.३) उमेदवारी अर्ज जमा करण्याच्या शेवटच्या दिवशी सर्वच राजकीय पक्षाचे नेते व पदाधिकाऱ्यांची उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी धावपळ होणार आहे.

सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल होण्याची शंभरी पार होते काय याकडे लक्ष राहणार आहे. एकीकडे बाजार समिती बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे प्रत्येक राजकीय पक्षाला आपल्या ताकदीनुसार व भविष्यातील सोयीनुसार संचालक मंडळात हिस्सा पाहिजे असल्याचे बोलले जात आहे.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

भूमिका नसल्याने पक्षांतर्गत गटागटात विखुरलेला भाजप बाजार समिती निवडणुकीसाठी मात्र एकसंध दिसत आहे. तर दुसरीकडे काँग्रेस, शिवसेना शिंदे गट व ठाकरे गटातील कार्यकर्त्यांनी वेट ॲन्ड वॉचची भूमिका घेतली असल्याचे दिसून येत आहे. मात्र मागील २० वर्षांपासून कृषी उत्पन्न बाजार समितीचा कार्यभार पाहणारे राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष व माजी आमदार उदेसिंग पाडवी यांची भूमिका महत्त्वाची मानली जात आहे.

त्यात कोणत्या पक्षाला किती जागा याचा फॉर्म्युल्यावर केवळ चर्चा रंगल्या आहेत. मात्र जाहीरपणे कोणीही भूमिका मांडताना दिसत नसल्याने संभ्रम वाढला आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या सोमवारी शेवटचा दिवस आहे. त्यानंतर ५ एप्रिलला छाननी होऊन ६ ते २० एप्रिलपर्यंत माघार घेता येणार आहे. त्यानंतरच निवडणूक होणार की बाजार समिती बिनविरोध होणार याचे चित्र स्पष्ट होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup: भारताच्या प्लेइंग -11 मध्ये पंत की सॅमसन? गावसकर म्हणाले, 'यष्टीरक्षक म्हणून तुलना केली तर...'

Exit Polls: अमित शाहांचं 'मिशन १२०' काय आहे? पक्षाला बळकटी देण्यासाठी भाजपच्या चाणक्याची रणनिती; एक्झिट पोलमधून मिळाले संकेत

Porsche Crash Case: अपघातानंतर ब्लड सॅम्पल बदलण्याचा सल्ला कोणी दिला? पुणे पोर्शे प्रकरणातील अल्पवयीन आरोपीच्या आईचा खुलासा

T20 World Cup: न्युयॉर्कमध्ये टीम इंडियाच्या सुरक्षेबाबत हयगय नाही! विराटभोवतीही दिसला सुरक्षारक्षकांचा घेरा, Video Viral

Kolhapur Crime News: मुंबई बॉम्बस्फोट हल्ल्यातील आरोपीचा कारागृहात हत्या, कैद्यांच्या दोन गटात मारहाणीवेळी घडली घटना

SCROLL FOR NEXT