Nandurbar Crime : निगदीचा कुंड्यापाडा येथे 650 किलो गांजा जप्त; धडगाव पोलिसांची कारवाई

A police team including Police Inspector Ishamoddin Pathan of Dhadgaon Police Station.
A police team including Police Inspector Ishamoddin Pathan of Dhadgaon Police Station. esakal

धडगाव (जि. नंदुरबार) : तालुक्यातील निगदीचा कुंड्यापाडा येथे आंब्याच्या बागेत चोरून गांज्याचे पिके घेणाऱ्यास धडगाव पोलिसांनी छापा टाकून अटक केली आहे. यात ६५० किलो एकूण ४५ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. (650 kg ganja seized at Kundyapada of Nigdi nandurbar news)

नंदुरबार जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील यांना मिळालेल्या माहितीनुसार निगदीचा कुंड्यापाडा शिवारात एका इसमाने त्याचे आंब्याचे झाडे असलेल्या शेतात बेकायदेशीररीत्या गांजाच्या झाडांची लागवड केली आहे. धडगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक इशामोद्दीन पठाण व त्यांचे एक पथक तयार करून त्यांना कारवाई करण्याचे श्री. पाटील यांनी आदेश दिले.

धडगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक इशामोद्दीन पठाण व पथक घटनास्थळी गेले असता आंब्याच्या शेतात हालचाली करत असल्याचे दिसून आले. पोलिसांनी आंब्याचे झाडे असलेल्या शेताची पाहणी केली असता आतील बाजूस गांजा सदृश झाडांची लागवड केल्याचे दिसून आले. रुपजा सिंगा पाडवी (रा. निगदीचा कुंड्यापाडा) यांच्याविरुद्ध धडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

A police team including Police Inspector Ishamoddin Pathan of Dhadgaon Police Station.
Nashik Crime : इनोव्हा कारची सिनेस्टाईल चोरी ‘CCTV’मध्ये कैद; 10 मिनिटांत चोरट्यांनी ठोकली धूम

सदरची कारवाई नंदुरबार जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील, अपर पोलिस अधीक्षक नीलेश तांबे, शहादा विभागाचे उप विभागीय पोलिस अधिकारी श्रीकांत घुमरे यांचे मार्गदर्शनाखाली धडगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक इशामोद्दीन पठाण, पोलिस हवालदार पुष्पेंद्र कोळी, राजेंद्र जाधव, जयेश गावित, स्वप्नील गोसावी, शशिकांत वसईकर, दीपक वारुळे, मनोज महाजन, विनोद पाटील, रितेश बेलेकर, गणेश मराठे, जानसिंग वळवी, सायसिंग पाडवी, प्रतापसिंग गिरासे, सुनीलकुमार सूर्यवंशी यांचे पथकाने केली.

A police team including Police Inspector Ishamoddin Pathan of Dhadgaon Police Station.
Nashik Crime News : नाशिक रोड पोलिसांकडून 2 मोठ्या चोरीची उकल..

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com