Bribe crime
Bribe crime esakal
उत्तर महाराष्ट्र

शेतजमीन कामकाजासाठी लाचेची मागणी; तहसीलदारासह दोघे लाचलुचपतच्या जाळ्यात

सकाळ वृत्तसेवा

पिंपळनेर (जि. धुळे) : येथील अपर तहसीलदार विनायक थविल यांनी खासगी व्यक्ती संदीप मुसळे यांच्यामार्फत तक्रारदाराकडे २५ हजार रुपये लाचेची मागणी केल्याने त्यांच्याविरुद्ध धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली. संशयित थविल व मुसळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली.

तक्रारदार पिंपळनेर (ता. साक्री) येथील रहिवासी असून, त्यांनी मौजे ढोलीपाडा (ता. साक्री) येथे नवीन अविभाज्य शर्तीच्या शेतजमिनीच्या खरेदीचा व्यवहार रजिस्टर सौदा पावतीने केला होता. ही शेतजमीन भोगवटादार वर्ग-१ करण्यासाठी शेतजमिनीच्या मालकांनी २३ सप्टेंबर २०२१ ला अपर तहसीलदार विनायक थविल यांच्याकडे अर्ज केला होता. या प्रकरणात अपर तहसीलदार थविल यांनी ४ मे २०२२ ला सातबारा उतारे व नोंदी सादर केलेल्या नाहीत हे कारण दाखवून प्रकरण तूर्तास निकाली काढले. त्यानंतर तक्रारदार यांनी या प्रकरणातील कागदपत्रांची पूर्तता करून वेळोवेळी तहसीलदार थविल यांची भेट घेतली. त्यांनी या प्रकरणाचा चौकशी अहवाल जिल्हाधिकारी (धुळे) कार्यालयात पाठविण्यासाठी तक्रारदाराकडे २५ हजार रुपयांची लाचेची मागणी केली. या संदर्भात तक्रारदाराने दूरध्वनीद्वारे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (धुळे) कार्यालयाकडे तक्रार केली. त्यावरून धुळे लाचलुचपत प्रतिबंधकाचे पथकाने पिंपळनेर येथे येऊन तक्रारदाराची तक्रार नोंदवून घेतली.

तक्रारीच्या अनुषंगाने ८ जूनला पडताळणी केली असता पडताळणीदरम्यान अपर तहसीलदार विनायक सखाराम थविल यांनी खासगी व्यक्ती संदीप मुसळे यांच्यामार्फत तडजोडीअंती २५ हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती. परंतु त्यांना तक्रारदार यांच्याबाबत शंका आल्याने त्यांनी तक्रारदार यांच्याकडून लाचेची रक्कम स्वीकारण्यास टाळाटाळ केली. दरम्यान, तहसीलदार थविल यांनी खासगी व्यक्ती मुसळे याला प्रोत्साहित करून तक्रारदार यांच्याकडे लाचेची मागणी केली. म्हणून नमूद आरोपितांनी स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी भ्रष्ट व बेकायदा मार्गाचा अवलंब करून अनधिकाराने पदाचा दुरुपयोग केला म्हणून त्यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ चे कलम ७ व ७ अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलिस उपअधीक्षक अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रकाश झोडगे, मंजितसिंग चव्हाण, राजन कदम, शरद काटके, कैलास जोहरे, भूषण खलाणेकर, गायत्री पाटील, भूषण शेटे संदीप कदम, संतोष पावरा, सुधीर मोरे व जगदीश बडगुजर यांनी ही कारवाई केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT