Buldhana news
Buldhana news sakal
उत्तर महाराष्ट्र

Buldhana news : शेगाव बाजार समितीची १०० कोटींच्या वर उलाढाल ; मागील वर्षाच्या तुलनेत ३५ लाखाने वाढले उत्पन्न

सकाळ वृत्तसेवा

शेगाव (बुलढाणा) : शेतकऱ्यांचे हित जोपासणाऱ्या येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये वर्षभरात धान्य खरेदीच्या माध्यमातून १०० कोटींच्या वर या आर्थिक उलाढाल झाली आहे. तर ३१ मार्च अखेरपर्यंत मागील वर्षीच्या तुलनेत ३५ लाख रुपयांनी उत्पन्न वाढेल असा अंदाज आहे. स्व. गजानन दादा पाटील कृषी उत्पन्न बाजार समिती असे नामकरण करण्यात आलेल्या शेगाव येथील बाजार समितीचे उत्पन्नात वाढ होत आहे.यंदा एक कोटी चाळीस लाख रुपयांचे उत्पन्न या बाजार समितीला झाले आहे. गेल्या ४० वर्षापासून सहकार नेते पांडुरंगदादा पाटील यांच्या मार्गदर्शन व नेतृत्वामध्ये ही बाजार समिती भरभराटीला जात आहे.

या बाजार समितीमध्ये धान्य बाजारात सद्या १० अडते ३० व्यापारी १०० चे जवळपास हमाल मापारी कार्यरत आहेत.तर यंदा कापूस खरेदी शेगाव बाजार समिती अंतर्गत च्या चार पैकी दोन जीनिंग मध्ये करण्यात आली. बाजार समितीने शेतकऱ्यांच्या हितासाठी शेगाव मुख्य बाजार समितीचे आवारात चार कोटी रुपयाच्या निधी अंतर्गत नवीन प्रशासकीय इमारत तसेच 26 व्यापारी कमर्शियल गाडे हे विकासकाम सध्या सुरू केले आहे त्याचप्रमाणे माटरगाव उपबाजार येथे १ कोटी १० लाख रुपयांचे एक हजार मेट्रिक टन क्षमतेचे गोदाम बांधकाम सुरू केले आहे.

तसेच शेतकऱ्यांचे हित लक्षात घेता केंद्र शासनाच्या नाफेड योजने अंतर्गत शासकीय हमीभाव माटरगाव उपबाजार येथे खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे त्याचप्रमाणे कॅन्सर ग्रस्त शेतकरी बांधवांना पाच हजार रुपयाची आर्थिक मदत बाजार समितीकडून देण्यात येते हे उल्लेखनीय शेगाव बाजार समिती ही ओवा खरेदीसाठी प्रसिद्ध बाजार समिती आहे ओवा खरेदी करण्यात येत असल्याने या बाजार समितीमध्ये बुलढाणा व अकोला तसेच आजूबाजूच्या जिल्ह्यातूनही शेतमाल मोठ्या प्रमाणात येत असतो एकंदरीत शेतकऱ्यांना सर्व सोयी सुविधा पुरवण्यासाठी नेहमी ही बाजार समिती तत्पर असते बाजार समितीचे आवारामध्ये शेतमाल चोरी जाऊ नये या दृष्टीने सुरक्षिततेसाठी आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली आहे बाजार आवारामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत तसेच रात्रीचे वेळी सुरक्षारक्षक तैनात असतो.

बाजार मध्ये दोन्हीकडून प्रवेशद्वार असून रात्रीचे वेळी दोन्ही गेट बंद करण्यात आलेले असतात. त्यामुळे पूर्वीचे तुलनेत शेतमाल चोरी जाण्याचे प्रमाण कमी झाले आहे. बाजार समितीच्या मुख्य प्रवेशद्वारावर स्क्रीन द्वारे शेतमालाचे बाजारभाव दररोज प्रदर्शित करण्यात येतात याचा बहुतांश शेतकरी बांधवांना लाभ होत आहे खामगाव बाजार समिती मध्ये जो भाव शेतकऱ्यांना मिळतो तोच भाव शेगाव बाजार समितीत मिळावा यासाठी ही बाजार समिती प्रयत्न करीत आहे. त्यामुळे शेगाव बाजार समितीत शेतमालाची आवक आता वाढत आहे.

शेगाव बाजार समितीने उत्कृष्ट काम केल्याबद्दल यंदा राज्य शासनाच्या मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन स्मार्ट प्रकल्प योजने मध्ये बुलडाणा जिल्ह्यामध्ये प्रथम अमरावती विभागात ४ था तर राज्यामध्ये ११ वा.क्रमांक मिळालेला आहे. गेल्या काही वर्षापासून शेगाव बाजार समितीमध्ये सहकार नेते पांडुरंगदादा पाटील यांचे अधिपत्याखालील संचालक मंडळ कार्यरत असून ते शेतकरी हित लक्षात घेऊन काम करत आहेत.त्यामुळे बाजार समितीचे कार्य छान सुरू आहे. शेतकरी बांधवांना सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत.

- गोपाळराव मिरगे

सभापती कृऊबास शेगाव

शेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चांगला भाव मिळत असल्याने शेतकरी बांधवांनी इतरत्र न जाता येथेच आपला शेतमाल विक्रीसाठी आणावा व बाजार समिती मधील सर्व सुविधांचा लाभ घ्यावा.

- विलास पुंडकर

सचिव कृ ऊ बा स शेगाव

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT