सौरभ अमृते  esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule : सावकारांच्या जाचामुळे तरूणाची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा

धुळे : कुटुंबावर काही संकटे, पत्नी गर्भवती असतानाही सावकारांच्या जाचामुळे सौरभ दिलीप अमृते या तरुणाने एक ऑक्टोबरला आत्महत्या केली. या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद झाली असली तरी आझादनगर पोलिस ठाण्याच्या तपासाकडे धुळेकरांचे लक्ष लागून आहे.(tired of moneylenders trouble young man suicide dhule latest news)

व्यावसायिक अमृते कुटुंबावर काही वर्षांत अनेक संकटे कोसळली. तरीही न डगमगता ते पायावर उभे राहिले. या कालावधीत सौरभ याने काही सावकारांकडून पैसे घेतले. त्याने व्याजासह मुद्दल फेडूनही सावकारांचा जाच कमी होत नव्हता. ते सौरभ याच्याकडे पैशांची मागणी करत होते.

सौरभने चारपटीने पैसे फेडल्याची चर्चा लपून राहिलेली नाही. तरीही सावकारांनी सौरभच्या घरात प्रवेश करून त्याला गर्भवती पत्नीसमोर शिवीगाळ केली. धमकी दिली. अर्व्याच्य, बीभत्स भाषेत सौरभचा पाणउतारा केला. काही राजकीय मंडळींनी सावकार व सौरभमध्ये समेट घडवून आणण्याचा प्रयत्न केला.

मात्र, सावकारांचा जाच थांबणार नाही या भीतीतून त्याने आत्महत्या केली. त्याचा वर्षापूर्वीच विवाह झाला होता. या घटनेमुळे सौरभचे कुटुंबीय धास्तावलेले आहेत. सरासरी दहा ते बारा सावकारांच्या पाशात सौरभ अडकलेला होता.

यासंदर्भात आझादनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रमोद पाटील म्हणाले, की सौरभने आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केल्याचे त्याच्या कुटुंबीयांनी सांगितले. त्याने आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहिलेली नाही. तसेच त्याच्या मृत्यूस सावकार कारणीभूत असून त्यातील काही व्यक्तींवर संशय व्यक्त करण्यात आला आहे. यासह चिठ्ठीबाबत वस्तुस्थिती तपासातून पुढे येईल. मात्र, सौरभ अमृते या तरुणाच्या आत्महत्येनंतर खळबळ उडाली असून सावकारी क्षेत्राचे धाबे दणाणले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup:'...तरच अभिषेक शर्माला फलंदाज समजेल', IND vs PAK सामन्यापूर्वी पाकिस्तानी गोलंदाजाचं चॅलेंज

VIDEO : कोल्हापुरात 'व्हॅलेंटाईन डे'ला अघोरी कृत्य; हळद-कुंकू लावून झाडाला तरुणीचा फोटो अन् काळी बाहुली खिळ्याने ठोकली, भानामती की बदनामीचा कट?

Malegaon News : माळेगाव कारखान्याच्या अध्यक्षपदी सुनेत्रा पवार?; संचालक मंडळाची एकमुखी सहमती

Latest Marathi News Live Update : पुढील तीन ते चार दिवस शरद पवार घरीच आराम करणार; सुप्रिया सुळे यांची माहिती

गाडीतून उतर, लायसन दे! महिला पोलिसाने अडवलं, कॅब चालकाशी घातला वाद; VIDEO VIRAL

SCROLL FOR NEXT