उत्तर महाराष्ट्र

आखातींसाठी राज्यात पर्यटनाच्या संधी - जयकुमार रावल

सकाळवृत्तसेवा

धुळे - आखाती, आफ्रिकन देशांतील उद्योगांसाठी महाराष्ट्राच्या पर्यटन आणि उद्योग क्षेत्रात मोठ्या संधी आहेत. या उद्योग संधींचा उद्योजकांनी लाभ घ्यावा, यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येतील, असे आश्‍वासन पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी दुबईत शनिवारी केल्याचे त्यांनी "सकाळ'ला सांगितले. 

गल्फ महाराष्ट्र बिझनेस फोरमतर्फे दुबईत चौथ्या आंतरराष्ट्रीय बिझनेस कॉन्फरन्स महाबिझ 2018 चे उद्‌घाटन मंत्री रावल आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केले, त्या वेळी मंत्री रावल बोलत होते. आखाती आणि आफ्रिकन देशांतील सुमारे पाचशे उद्योजक, महाराष्ट्रातील उद्योजक या परिषदेला उपस्थित होते. 

आफ्रिकन देश, आखाती देश आणि महाराष्ट्र राज्य यांच्यात एकमेकांत पर्यटन, आरोग्य, शिक्षण, सेवा, माध्यम, माहिती तंत्रज्ञान, रिअल इस्टेट, व्यापार आदी 10 उद्योग क्षेत्रात कशा रोजगार, उद्योग संधी आहेत, भांडवल वृद्धी आणि कर्ज उभारणीची प्रक्रिया काय आहेत, यावर या परिषदेत चर्चा, परिसंवाद झाले. 

हज यात्रेकरू कोट्यात वाढ  
मंत्री जयकुमार रावल यांच्या प्रयत्नामुळे सौदी अरब सरकारने भारतातील हज यात्रेकरूंचा कोटा पाच हजाराने वाढवला आहे. गेल्या आठवड्यात मुंबईत झालेल्या हज उमराह इंटरनॅशनल फोरमच्या ट्रॅव्हल मार्ट कार्यक्रमात 40 आंतरराष्ट्रीय हज टूर ऑपरेटर सहभागी झाले होते. त्या वेळी मंत्री रावल यांनी हज यात्रेकरू कोटा वाढवून देण्याची मागणी केली होती. सौदी अरब सरकारने ही मागणी मान्य केली. दोन वर्षांत दुसऱ्यांदा भारताला हजयात्रेकरूंचा कोटा वाढवून देण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Telangana CM Revanth Reddy : तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना दिल्ली पोलिसांचं समन्स; अमित शाहांच्या व्हिडीओचं प्रकरण

Sairat Complete 8 Years : मराठी सिनेमाला १०० कोटींचं स्वप्न दाखवणाऱ्या 'सैराट'ला ८ वर्षं पूर्ण; रिंकूची पोस्ट चर्चेत

Share Market Closing: शेअर बाजारात तुफान तेजी; सेन्सेक्स 900 अंकांच्या उसळीसह बंद, गुंतवणूकदार मालामाल

Latest Marathi News Live Update: उदयनराजेंच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी कराडमध्ये दाखल

Nashik News : मालेगावी भाजीपाल्याची आवक स्थिर! मे, जून महिन्यात उत्पादन घटण्याचा अंदाज

SCROLL FOR NEXT