crime esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar Crime News : मोटारसायकलच्या डिकीतून अडीच लाख लुटले

पंचायत समिती कार्यालय परिसरात केंद्रीय राज्य राखीव दलातील निवृत्त कर्मचाऱ्याच्या मोटारसायकलच्या डिकीतून चोरट्यांनी अडीच लाख रुपये नेल्याची घटना नुकतीच घडली.

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar Crime News : येथील पंचायत समिती कार्यालय परिसरात केंद्रीय राज्य राखीव दलातील निवृत्त कर्मचाऱ्याच्या मोटारसायकलच्या डिकीतून चोरट्यांनी अडीच लाख रुपये नेल्याची घटना नुकतीच घडली. घटना सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली असून, चोरट्यांनी तोंडाला फडके बांधले असल्याने ते सापडू शकले नाहीत.

गुरुवारी दुपारी दीडच्या सुमारास निवृत्त केंद्रीय राज्य राखीव दलाचे जवान किशोर आत्माराम पाटील (रा. फेस, ता. शहादा) यांनी स्टेट बँक शहादा येथून अडीच लाख रुपयांची रक्कम काढली. (Two and half lakh were stolen from trunk of motorcycle nandurbar crime news)

त्यांनी रोकड मोटारसायकल (एमएच ३९, टी ८७३०)च्या डिकीतील कापडी पिशवीत ठेवली व तेथून ते दुपारी पावणेदोनला ग्रामपंचयातीच्या कामानिमित्त शहादा पंचायत समिती कार्यालयात आले. मोटारसायकल पंचायत समितीच्या आवारात लावून ते बांधकाम विभागाच्या दालनात गेले.

तेथे कनिष्ठ अभियंता हरीश भोई कार्यालयात नसल्याने किशोर पाटील पुन्हा मोटारसायकल उभी केली त्या ठिकाणी आले तेव्हा त्यांना त्यांची डिकी उघडी दिसली व त्यातील रक्कम त्यात दिसून आली नाही. त्यानंतर चोरी झाल्याचे स्पष्ट झाले.

याबाबत किशोर पाटील यांच्या फिर्यादीवरून शहादा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. हवालदार संजय ठाकूर तपास करत आहेत.

सीसीटीव्हीत कैद

दरम्यान, पंचायत समिती कार्यालयात जाऊन सीसीटीव्ही फुटेज तपासले असता काळ्या रंगाच्या विनाक्रमांकाच्या मोटारसायकलीवरून आलेल्या दोघांनी रक्कम लंपास केल्याचे स्पष्ट झाले. त्याआधारे पोलिसांनी चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना यश आले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT