उत्तर महाराष्ट्र

14 महिन्यात टँकरच्या पाण्यावर दोन कोटीचा चुराडा!

संतोष विंचू

येवला : ब्रिटिशकालापासून आजपर्यंत येवलेकरांचा उन्हाळा पूर्णतः टँकरच्या पाण्यावर अवलंबून आहे. सध्या तर चित्र भयानक असून सुमारे दीड लाख नागरिकांसाठी दररोज 98 टँकरद्वारे 20 लाखाच्या आसपास लिटर पाणीपुरवठा होतोय. विशेष म्हणजे मागील चौदा महिन्यापासून अव्याहतपणे टँकर सुरू असून यावरच शासनाने सुमारे दोन कोटीच्यावर पैशाचा चुराडा केला आहे.

जोरदार पाऊस होऊन नदी-नाले बंधारे विहिरी भरल्या तर तालुक्यात मार्चपर्यंत पाणी पुरते तरीही एप्रिल-मे मध्ये पन्नासच्या आसपास गावांना टँकरची गरज भासतेच असा इतिहास आहे. मात्र मागील वर्षातसह चालू वर्षीही पावसाने दगा दिल्याने तालुक्यातील भूजल पातळी मोठ्या प्रमाणात घटली आहे. परिणामी सर्वच जलसाठ्यानी माना टाकल्याचे चित्र दिसत आहे. यंदा तर दिवाळीपासूनच विहिरी कोरड्या ठाक होत्या परिणामी 12 मार्च 2018 रोजी सुरू झालेले टँकर अद्यापही बंद झालेले नाही, यावरून येथील दुष्काळाची व टंचाईची तीव्रता स्पष्ट होते.

चौदा महिन्याच्या काळात शासनाने तब्बल दोन कोटीहून अधिक निधी टँकरच्या भाड्यासह डिझेलवर खर्च केला तरीहीही पुरेशा प्रमाणात पाणी नागरिकांना मिळत नसल्याचे चित्र आहे. अनेक गावात लोकसंख्येच्या तुलनेत अपुरे पाणी मिळत असून खेपा वाढविण्याची मागणी अनेक भागातून सुरूच आहे. प्रशासनाने नागरिकांचा त्रास पाहून परिस्थितीनुसार तातडीने उपाययोजना कराव्यात अशी ही मागणी सातत्याने होत आहे.

टँकरची संख्या 43 वर..
सद्यस्थितीत तालुक्याला बारा हजार लिटरचे 28 टँकर, चोवीस हजार लिटरचे 12 व नऊ हजार लिटरचा एक व सहा हजार लिटरचा एक असे टँकर सुरू असून याद्वारे रोज 98 खेपा पाणीपुरवठा होत आहे.यानुसार सरासरी एका टँकरची एल खेप वीस हजार लिटरची जरी गृहीत धरली तरी तालुक्याीत सुमारे वीस लाख लिटर पाणीपुरवठा दिवसाला होत असल्याचे दिसते.या पाण्यावर सुमारे दीड लाखांवर नागरिक व हजारो जनावरांची तहान भागली जात आहे.

टँकरचे सलग 400 दिवस..
2018 मध्ये जानेवारीतच टंचाई जाणवू लागल्यावर काही गावांचे टँकरचे प्रस्ताव यंत्रणेकडे सादर करण्यात आले.मात्र जलयुक्तचे अपयश झाकण्यासाठी स्वत जिल्हाधिकार्यांनी टँकर सुरु करण्याकडे दुर्लक्ष केले.शिष्टमंडळाने भेट घेऊन आंदोलनाचा इशारा दिला तेव्हा 02 महिन्यानी म्हणजे 12 मार्चला तालुक्यात टँकरने पाणीपुरवठा सुरु झाला. खैरगव्हाण व कुसमाडी येथे टँकर सुरु झाले. मार्चमध्ये 04, एप्रिलमध्ये 13 तर मे मध्ये 24 गावांना टँकर सुरु करण्यात आले. चार-दोन दिवसांचे तांत्रिक अपवाद वगळता सुमारे 400 दिवस होत आले पण अजूनही टँकर सुरूच आहे. येथील दुष्काळाच्या इतिहासात प्रथमच असे घडल्याचे जाणकार सांगतात.

कधी नसेल इतकी भयानक पाणीटंचाई उद्भवल्याने ग्रामीण भाग होरपळून निघत आहे.प्रशासन मागणीनुसार उपाययोजना करत आहेत. आम्हीही परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहोत पण टंचाईप्रश्नी अडचणी असतील, वेळेत टँकर येत नसतील, प्रस्ताव द्यायचे असतील तर त्वरित पंचायत समितीशी संपर्क साधावा. टँकरसह खेपांचे प्रस्ताव असतील तर ताबडतोब सादर करावेत.- कविता नारायण आठशेरे, संभापती, येवला

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapuri Chaddar : मोदींना गिफ्ट दिलेल्या सोलापुरी चादरीचा इतिहास माहित आहे का ?

Latest Marathi News Live Update : तुमची संपत्ती लुटणारं सरकार तुम्हाला हवं आहे का? पंतप्रधान मोदींची पुन्हा काँग्रेसवर टीका

Heat Wave : विदर्भात आजपासून उष्णतेची लाट, नागरिकांनी काळजी घेण्याची गरज

Sangli Lok Sabha : 'जयंत पाटील काड्या करण्यात आणि संजय पाटील थापेबाजीत पटाईत'; माजी आमदाराची जोरदार टीका

Babil Khan: इरफान खानच्या लेकाचं होतंय कौतुक; पाण्याच्या समस्येसाठी काम करणाऱ्या संस्थेला केली मोठी आर्थिक मदत

SCROLL FOR NEXT