उत्तर महाराष्ट्र

तनिष्का सदस्याच्या साखरपुड्यात तनिष्कांतर्फे ग्रंथराज ज्ञानेश्वरीसह अनोखी वृक्ष भेट!

प्रा.भगवान जगदाळे

निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील जैताणे (ता.साक्री) येथील तनिष्का गटाच्या सदस्या वर्षा प्रकाश वानखेडे व अभियंता विजय देविदास भामरे (धुळे) यांच्या साखरपुड्याच्या कार्यक्रमात सोमवारी (ता.22) तनिष्कांतर्फे ग्रंथराज 'ज्ञानेश्वरी' या अध्यात्मिक ग्रंथाच्या पाच प्रतींसह वृक्षाचे रोपटे भेट देण्यात आले. तनिष्कांच्या या अभिनव उपक्रमाचे उपस्थितांनी विशेष कौतुक केले.

तनिष्का गटाच्या अध्यक्षा मोहिनी गणेश जाधव यांच्यासह अन्य तनिष्का सदस्यांनी हा अनोखा, अभिनव उपक्रम राबविला. तनिष्का गटाच्या सदस्या वर्षा वानखेडेंचे डिप्लोमा (सिव्हिल) पदविकेपर्यंत, तर अभियंता विजय भामरे यांचे एम.टेक (इलेक्ट्रॉनिक्स) पर्यंत पदव्युत्तर पदवीचे उच्चशिक्षण झाले आहे. याप्रसंगी ग्रंथभेट, वृक्षभेटीसह 'झाडे लावा, झाडे जगवा' व 'वाचनसंस्कृती जोपासण्याचा' अनोखा संदेश उपस्थितांना तनिष्कांतर्फे देण्यात आला. 

यावेळी आप्तेष्टांसह सामाजिक कार्यकर्ते देविदास भामरे, मनीषा भामरे, प्रकाश वानखेडे, देवकाबाई वानखेडे, प्रमिलाबाई जाधव, मालती जाधव, गणेश जाधव, तनिष्का गटप्रमुख मोहिनी जाधव, सदस्या नलिनी जाधव, सीमा भदाणे, गौरी ठाकरे, शुभांगी ठाकरे, जयश्री जाधव, रुक्मिणी वानखेडे, अर्चना वानखेडे यांच्यासह सरपंच ईश्वर न्याहळदे, माजी सरपंच संजय खैरनार, सहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप खेडकर, रघुवीर खारकर, नंदकुमार विसपुते, भिला ठाकरे, 'अंनिस'चे कार्यकर्ते भगवान जगदाळे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PUC Fee Hike: वाहनचालकांना मोठा झटका! महाराष्ट्रात PUC तपासणीचे दर वाढले, आता किती पैसे मोजावे लागणार?

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, भरधाव येणाऱ्या स्कॉर्पिओचा टायर अचानक फुटला

Marathi News Live Updates : विडी उद्योजकांकडून महाराष्ट्र सोडूण्याचा इशारा, कारण काय?

Paithan Bus Accident: पैठणमध्ये भरधाव ट्रॅव्हल बसची ट्रकला जोरदार धडक; आठ प्रवासी जखमी, तिघांची प्रकृती गंभीर

Bhujang Tirtha: ब्रह्मगिरीच्या पायथ्याशी ‘भुजंगतीर्था’ची स्थाननिश्चिती; इतिहासतज्ज्ञांकडून त्र्यंबकेश्‍वरच्या तीर्थपरंपरेतील महत्त्वाचा दुवा उजेडात

SCROLL FOR NEXT