Dr.-Vaijayanti-kakade
Dr.-Vaijayanti-kakade 
उत्तर महाराष्ट्र

डॉ. वैजयंती काकडे यांची ओव्हरडोस घेऊन आत्महत्या

सकाळवृत्तसेवा

सिन्नर - येथील प्रसिद्ध भूलतज्ज्ञ डॉ. वैजयंती अभिजित काकडे (वय ४३) यांनी भुलीचे इंजेक्‍शन स्वतःच्या हाताच्या नसेत घेऊन आत्महत्या केली. डॉ. काकडे यांनी स्वतःच्या घराच्या गच्चीवर हा प्रकार केला असल्याचे मध्यरात्री दीडच्या सुमारास उघडकीस आले.

नाशिक-पुणे महामार्गावरील वाजे पेट्रोलपंपासमोर स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. अभिजित काकडे यांचे भारती हॉस्पिटल आहे. अवघ्या एक वर्षापूर्वी डॉ. काकडे यांनी नवीन जागेत रुग्णालय स्थलांतरित केले. त्यांच्या पत्नी डॉ. वैजयंती सिन्नर शहरात भूलतज्ज्ञ म्हणून प्रसिद्ध होत्या. रुग्णालयाच्याच इमारतीत वरच्या मजल्यावर डॉ. काकडे दांपत्य वास्तव्याला होते. मध्यरात्री जाग आल्यानंतर डॉ. अभिजित काकडे सौ. काकडे यांना शोधण्यासाठी बाहेर आले. परंतु रुग्णालयाकडे जाणारा दरवाजा बंद असल्याने ते गच्चीकडे गेले असता डॉ. वैजयंती मृतावस्थेत आढळल्या. सिन्नर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. बुधवारी (ता. २) दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. उच्चशिक्षित डॉक्‍टराकडून आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले गेल्याने शहर व तालुक्‍यात खळबळ उडाली आहे.

कौटुंबिक कलहाचा संशय
मृत डॉ. वैजयंती काकडे यांच्या घटनेनंतर वैद्यकीय व्यावसायिकांमध्ये कौटुंबिक कलहाची चर्चा होती. काकडे दाम्पत्याची दोन्ही मुले नाशिक येथे शिकण्यास आहे. पोलिसांनी शवविच्छेदनावेळी व्हिसेरा राखून ठेवला आहे. न्यायवैद्यक प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण समजेल, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिलीृ.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : तुमची संपत्ती लुटणारं सरकार तुम्हाला हवं आहे का? पंतप्रधान मोदींची पुन्हा काँग्रेसवर टीका

Sangli Lok Sabha : 'जयंत पाटील काड्या करण्यात आणि संजय पाटील थापेबाजीत पटाईत'; माजी आमदाराची जोरदार टीका

Solapuri Chaddar : मोदींना गिफ्ट दिलेल्या सोलापुरी चादरीचा इतिहास माहित आहे का ?

Babil Khan: इरफान खानच्या लेकाचं होतंय कौतुक; पाण्याच्या समस्येसाठी काम करणाऱ्या संस्थेला केली मोठी आर्थिक मदत

Lok Sabha Election: PM मोदींच्या सभेमुळे ६ ठिकाणी वाहनतळ, ५ ठिकाणचे रस्ते बंद, २० मिनीटे अंत्ययात्रा रोखली

SCROLL FOR NEXT